आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये, शिंदे गटाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेनेचे (शिंदे गट) बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येच्या विषयावर वादग्रस्त विधान केले आहे.
आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या विधानावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी टीका होत आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही जाऊ नये, असं वादग्रस्त वक्तव्य केलय, जर कोणी अंत्यविधीला गेले नाही आणि मृतदेह प्राण्यांनी खाल्ला, तर होणार्या हालांची जाणीव होऊन इतर शेतकरी असे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, असा अजब तर्क त्यांनी मांडला.
शेतकरी आपल्या पत्नीसोबत सात फेरे घेऊन आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतो. मात्र, आर्थिक संकट आल्यावर तो विचार न करता आपल्या अर्धांगिनीला आणि मुलांना वार्यावर सोडून आत्महत्या करतो. आत्महत्या करण्याऐवजी शेतकर्यांनी आपल्या समस्या आमदार, खासदार किंवा सरकारला पत्र लिहून कळवाव्यात, जेणेकरून त्यांना मदत करता येईल, असे आवाहनही त्यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शेतकर्यांविषयी केलेल्या एका कथित विधानाबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलय.
राज्यात आधीच शेतकरी विविध नैसर्गिक आणि आर्थिक संकटांचा सामना करत असताना, एका लोकप्रतिनिधीने इतके असंवेदनशील वक्तव्य केल्यामुळे, शेतकरी संघटना आणि विरोधी नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या संवेदनशील मुद्द्यावर लोकप्रतिनिधींनी अधिक संवेदनशीलतेने बोलायला हवे, अशी भावना सामान्य जनता आणि शेतकरी संघटनांमधून व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या या विधानाला अत्यंत असंवेदनशील आणि अमानवी ठरवत विविध स्तरांवरून जोरदार टीका होत आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.









