जिल्हा भाजपतर्फे जनजातीय गौरव दिनानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम
महान स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ वी जयंती दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरात विविध लोककल्याणकारी उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणाऱ आहे जनजातीय गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा भाजपतर्फे देण्यात आली
भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष देवराम होळी, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहे.
देशभरात १० कोटी पेक्षा लोकसंख्या अनुजमती समाजाची आहे. १५ नोव्हेंबर २०२१ पासून जनजाती गौरव दिवस देशभरात साजरा केला जातो. २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात प्रथम जनजाती समाजाची महिला राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या विराजमान झाल्या आहेत.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार देशभरात ११ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जनजातीय गौरव दिन सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, थोर आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विविध कार्यक्रमांची रूपरेषा अशी
१३ नोव्हेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम व अनुसूचित जामती समाजाचा महापुरुषांच्या स्मारकाजवळ दीपोत्सव,
१४ नोव्हेंबर रोजी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता,
१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन माल्यार्पण व जीवन चरित्रावर माहिती व व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.
१६ नोव्हेंबर रोजी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह शोभा यात्रा व आदीवासी समाजातील पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या सन्मान सोहळा
१७ नोव्हेंबर सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांसह जमातीच्या गौरवशाली परंपरा, संस्कृती आणि इतिहासाचे प्रदर्शन करण्यासाठी, विविध शाळा भव्य मिरवणुका, लोकनृत्य, लोकगीते, साहित्य चर्चा आणि विद्यार्थ्यांसाठी चर्चा, स्पर्धा व प्रदर्शने यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
१८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यात महिला बचत गटाना योजनांची माहिती देऊन आदिवासी समाजात जनजागृती करणे व आरोग्य शिबीर आयोजित करणे अश्या उपक्रमांद्वारे भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, जनजातीय गौरव दिनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही यावेळी स्पष्ट केले.
जनतेपर्यंत हे उपक्रम पोहचविण्याचं आवाहन आमदार सुरेश भोळे, भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ.राधेश्याम चौधरी(पश्चिम), चंद्रकांत बाविस्कर (पूर्व), यांनी केलं. यावेळी सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भंडारकर यांनी केले व आभार प्रदर्शन अनुसूचित जमाती (ST) मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हरीलाल कोळी (पुर्व) यांनी केले. या वेळी जिल्हा प्रभारी एसटी मोर्चा प्रल्हाद सोनवणे, अनुसूचित जमाती (ST) मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हरीलाल कोळी (पुर्व), सुभाष पवार (पश्चिम) दीपक कोळी (महानगर), यावेळी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस भूषण भिल, जिल्हा संयोजक पुंडलिक सपकाळे, बाळासाहेब सैंदाणे, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










