Friday, November 20, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

‘मुरासू’ चक्रीवादळाचा वेग वाढला; ३ नोव्हेंबरला धडकण्याची शक्यता, कोणकोणत्या राज्यांना रेड अलर्ट?

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 2, 2026
in india - world
0
‘मुरासू’ चक्रीवादळाचा वेग वाढला; ३ नोव्हेंबरला धडकण्याची शक्यता, कोणकोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘मुरासू’ चक्रीवादळाचा वेग वाढला; ३ नोव्हेंबरला धडकण्याची शक्यता, कोणकोणत्या राज्यांना रेड अलर्ट?

 

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

 गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशला मोठा तडाखा दिला. या वादळामुळे हजारो हेक्टरवरील भातशेती आणि फळबागांचे नुकसान झाले, तर ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या.

या संकटातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. ‘मुरासू’ असे या नव्या चक्रीवादळाचे नाव आहे. या पार्श्वभूमीवर हे वादळ किती धोकादायक ठरू शकते आणि त्याचा कोणकोणत्या राज्यांना तडाखा बसू शकतो? जाणून घेऊ…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून रविवारी ‘मुरासू’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. या चक्रीवादळाला ‘मुरासू’ हे नाव देण्यात आले आहे. तमिळ भाषेत ‘मुरासू’ या शब्दाचा अर्थ ‘ढोल’ किंवा ‘युद्धाचा नगारा’ असा होतो. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि उत्तर तमिळनाडूच्या लगतच्या किनारपट्टी भागाला इशारा देण्यात आला आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ‘मुरासू’ चक्रीवादळाची तीव्र वाढून त्याचे ‘अति तीव्र चक्रीवादळात’ रूपांतर झाले. मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास हे वादळ ताशी सुमारे २० किलोमीटर वेगाने वायव्य दिशेने पुढे सरकत होते. २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान, ओंगोलजवळ धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुरासू चक्रीवादळ नेमके किती धोकादायक?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवर धडकताना मुरासू चक्रीवादळाचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या वादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर सुमारे दोन मीटर उंचीच्या समुद्रलाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याचा धोका वाढू शकतो. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पुढील २४ तासांत ११५ मिलिमीटर ते २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या भागांत पूरस्थिती, पाणी साचणे आणि जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका आहे. तसेच पायाभूत सुविधा आणि शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः अर्णब चक्रीवादळामुळे आधीच नुकसान झालेल्या भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे ओडिशामध्ये मंगळवारी (३ नोव्हेंबर) वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर, तर झोतांचा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात ३ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत जहाजांची वाहतूक आणि मासेमारी पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्या राज्यांना फटका बसण्याची शक्यता?

आंध्र प्रदेशच्या मध्य आणि दक्षिण किनारपट्टीला या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पाच जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये कृष्णा, गुंटूर, बापटला, प्रकाशम आणि श्री पोटी श्रीरामुलु नेल्लोर या जिल्ह्यांचा समावेश आहे. २ आणि ३ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह रायलसीमा भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या दोन दिवसांत किनारपट्टीच्या भागांत वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि जोरदार वारे वाहणार असल्याचे सांगितले जात आहे. खम्मम, नलगोंडा, सूर्यापेट, महबूबनगर, नागरकर्नूल आणि वनपर्ती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जंगाव, यादाद्री भुवनगिरी, रंगारेड्डी, हैदराबाद आणि मेडचल-मलकाजगिरी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय भद्राद्री कोठागुडेम, वारंगल आणि हनमकोंडा जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ओडिशा, तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

ओडिशाच्या दक्षिणेकडील भागात २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून, ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी दक्षिण ओडिशातील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः दक्षिण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. काही भागांत ७ ते २० सेंटीमीटर पावसाची नोंद होऊ शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मुरासू चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या शेजारील किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याने हवामान विभागाने तमिळनाडूतील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. चेन्नई आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय चेंगलपट्टू, कांचीपुरम, राणीपेट, वेल्लोर आणि निलगिरी या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा सामना आंध्र प्रदेशची तयारी काय?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ‘मुरासू’ चक्रीवादळाच्या संभाव्य प्रभावाचा आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत पावसाचा आणि वाऱ्याचा वेग, जलाशयांमधील पाणीपातळी तसेच खबरदारीच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री नायडू यांनी २ नोव्हेंबर रोजीचा आपला नियोजित दिल्ली दौरा रद्द केला. तसेच मदत व बचाव कार्यासाठी यंत्रणेने पूर्णपणे सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. आंध्र प्रदेशच्या दिशेने आणखी एक चक्रीवादळ वेगाने येत असून, अधिकाऱ्यांनी मदत आणि बचाव कार्यासाठी पूर्णपणे तयारीत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आंध्र प्रदेशच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने चक्रीवादळग्रस्त होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये १,६८८ वैद्यकीय पथके तैनात केली असून ११६ मदत शिबिरे सज्ज ठेवली आहेत. विभागाने १३,१६५ आपत्कालीन खाटांची सोय केली आहे. तसेच मुबलक प्रमाणात आवश्यक औषधे आणि ४३,६७२ सर्पदंशावरील इंजेक्शनचा साठा उपलब्ध केला आहे. याव्यतिरिक्त, ‘१०८’ आपत्कालीन सेवेच्या ७३३ रुग्णवाहिका, ‘१०२’ सेवेची ३०० ‘थल्ली बिड्डा एक्स्प्रेस’ वाहने आणि ‘१०४’ सेवेची ७२१ फिरती वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आल्याचे समजते.

ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी

ओडिशा सरकारने दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. सखल भागात आणि दरडप्रवण डोंगराळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना सूक्ष्म-नियोजन आखून संवेदनशील भागातील लोकांना सुरक्षित निवारण शिबिरांमध्ये पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने मच्छिमारांना २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. संभाव्य धोका असलेल्या भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि ओडिशा आपत्ती जलद कृती दल (ODRAF) च्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, ओडिशातील गंजाम जिल्हा प्रशासनाने पूर आणि पाणी साचण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये पुरेशा प्रमाणात अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तमिळनाडू सरकारकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर तमिळनाडूच्या महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अतिदक्षतेवर राहण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यास, आपत्ती व्यवस्थापनाच्या मानक कार्यपद्धतींचे पालन करण्यास आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची माहिती तातडीने राज्य आपत्कालीन नियंत्रण केंद्राला देण्यास सांगण्यात आले. दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन चेन्नई आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील शाळा २ नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चक्रीवादळाचा देशातील इतर राज्यांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

एकाच घरातून सलग 3 दिवस 30 साप बाहेर पडले, ग्रामस्थांनी खोदलं घर, समोरच दृश्य पाहाताच फुटला घाम, विश्वासच बसना

Next Post

ऐन दिवाळीच्या तोंडावर सिलेंडर महागला |

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
ऐन दिवाळीच्या तोंडावर सिलेंडर महागला |

ऐन दिवाळीच्या तोंडावर सिलेंडर महागला |

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697