Friday, November 20, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

‘प्रेमसंबंध तोड, नाहीतर जीव घेईन’, बापाची धमकी पोरीनं हलक्यात घेतली, मध्यरात्री बापाने शब्द खरा करून दाखवला, घरातच लेकीची निर्घृण हत्या

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 14, 2026
in india - world
0
‘प्रेमसंबंध तोड, नाहीतर जीव घेईन’, बापाची धमकी पोरीनं हलक्यात घेतली, मध्यरात्री बापाने शब्द खरा करून दाखवला, घरातच लेकीची निर्घृण हत्या
0
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘प्रेमसंबंध तोड, नाहीतर जीव घेईन’, बापाची धमकी पोरीनं हलक्यात घेतली, मध्यरात्री बापाने शब्द खरा करून दाखवला, घरातच लेकीची निर्घृण हत्या

 

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

घरात दिवाळीचा सण उत्साहात सुरू असताना बापाने आपल्या २१ वर्षीय लेकीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापाने मुलीची हत्या करण्यापूर्वी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मात्र जन्मदाता बाप आपल्याशी असं काही करणार नाही, असं तरुणीला वाटलं. मात्र मध्यरात्री बापाने मुलीला गाठून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपीनं मुलीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही खळबळजनक घटना गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील मेटपूर गावात घडली आहे. सानिया पटेल असं मृत तरुणीचं नाव असून आरोपी वडिलांचं ना कौशल पटेल आहे. खंभात शहर पोलिसांनी आरोपी पिता कौशल पटेल याला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

नेमकी घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटपूर गावात राहणाऱ्या कौशल पटेल याची २१ वर्षीय मुलगी सानियाचं गावातीलच एका तरुणाशी गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. मात्र, तो तरुण दुसऱ्या जातीचा असल्याने आणि त्याचा पगार १० ते १५ हजार रुपये असल्यानं कौशलचा या नात्याला तीव्र विरोध होता. वारंवार विरोध करूनही सानियाचं त्या तरुणाशी फोनवर बोलणं सुरूच होतं.

रविवारी संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र दिवाळी साजरी केली आणि रात्री उशिरा सर्वजण झोपी गेले. दरम्यान, पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, कौशलने सानियाला स्वयंपाकघरात गाठले आणि तिच्या प्रेमसंबंधांवरून पुन्हा जाब विचारला.

धमकीला मुलीने हलक्यात घेतलं

वाद वाढल्याने संतापलेल्या कौशलने सानियाला गळा आवळून मारण्याची धमकी दिली. मात्र, वडिलांची ही धमकी सानियाने केवळ थट्टा समजून दुर्लक्षित केली. याच गोष्टीचा राग आल्याने कौशलने सानियाची ओढणी पकडली आणि तिचा गळा आवळला. सानिया जमिनीवर कोसळेपर्यंत त्याने ओढणीचा फास घट्ट धरून ठेवला होता, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न, पण पोस्टमार्टमने पोलखोल केली

हत्येनंतर, मुलीने आत्महत्या केल्याचं भासवण्याचा कट रचण्यात आला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास कौशलनं व त्याच्या कुटुंबीयांनी सानियाचा मृतदेह खंभात जनरल हॉस्पिटलमध्ये नेला आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा केला. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांना प्रकृती संशयास्पद वाटल्याने त्यांनी फॉरेन्सिक शवविच्छेदन करण्याची शिफारस केली. त्यानुसार मृतदेह करमसद येथील श्री कृष्ण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सानियाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली.

पोलिसांसमोर आरोपी वडिलांची कबुली

पोलिसांच्या कडक चौकशीत आरोपी पिता कौशल पटेल याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेली ओढणी आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. खंभात शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पी. जे. बंटवा यांनी सांगितले की, आंतरजातीय संबंधांच्या वादातून हा खून झाला आहे. सानियाने बडोदा येथून बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केलं होतं आणि ती पुढील शिक्षण घेत होती. कोर्टाने आरोपी बापाला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

जळगाव जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; जळगावसह रावेर, यावल, भुसावळ, जामनेरमध्ये हादरे!

Next Post

जळगाव–धुळे थेट रेल्वे संपर्काचा मार्ग मोकळा? नरडाणा स्थानकाजवळ मोठ्या हालचाली?

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Next Post
जळगाव–धुळे थेट रेल्वे संपर्काचा मार्ग मोकळा? नरडाणा स्थानकाजवळ मोठ्या हालचाली?

जळगाव–धुळे थेट रेल्वे संपर्काचा मार्ग मोकळा? नरडाणा स्थानकाजवळ मोठ्या हालचाली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

जळगावातील सौ.सुशीला परशुराम झारे यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

निधन वार्ता - जळगाव येथील बळीराम पेठेतील रहिवासी सौ.सुशीला परशुराम झारे ( वय 82) यांचे आज शुक्रवार दि.20/11/2026 रोजी वृद्धापकाळाने...

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..

by दैनिक मार्केट स्पेशल
November 20, 2026
0

बस आता खूप झालं, उत्तर द्यावेच लागणार, भारतावर भडकले बांगलादेशचे पंतप्रधान, थेट..   बांगलादेशमध्ये तणाव आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले....

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील १९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या दहा महत्त्वाच्या बातम्या दैनिक मार्केट स्पेशल | जळगाव जिल्हा वृत्तसंकलन १. बोरणार येथे तरुणाचा...

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; पगार कपात, ओव्हरटाइम आणि सुट्ट्यांचे नियम बदलले नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने...

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

लग्नासाठी सोनं घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण? 50 हजारांनी स्वस्त झालं सोनं! सलग 10 दिवस घसरण; आजचा भाव किती?   सोनं-चांदीच्या...

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार ‘ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र’

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अडीचशे वर्षांचा इतिहास बदलणार; अमेरिकन संसदेचे नेतृत्व करणार 'ब्रुकलिनचा कृष्णवर्णीय सुपुत्र'   ऐतिहासिक उमेदवारी पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाची...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

व्यवसायात प्रगतीचे योग! पाहा आजचे तुमचे राशीभविष्य   मेष - आज आर्थिक नुकसानीचे योग आहेत, त्यामुळे सावध राहा. ऑफिसमध्ये तुमची...

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच… छोट्याशा गावात आहेत 17 बँका

by दैनिक मार्केट स्पेशल
November 19, 2026
0

भारतातील सर्वात श्रीमंत गाव हेच... छोट्याशा गावात आहेत 17 बँका साधारणपणे गाव म्हटलं की हिरवीगार शेतं, छोटी घरं, शांत वातावरण...

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर ! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कर्मचारी भविष्य निधी...

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस

by दैनिक मार्केट स्पेशल
November 18, 2026
0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजनांची बिनविरोध निवड, मुक्ताईनगरच्या जागेकडे सर्वांचं लक्ष; आज माघारीचा अखेरचा दिवस Jalgaon District Central Bank...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697