महिला आशिया कप 2026 : भारताच्या सेमीफायनलचा प्रतिस्पर्धी आज ठरणार
महिला आशिया कप 2026 मध्ये उपांत्य फेरीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन संघांनी अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले असून, चौथा संघ कोणता असेल, हे बांगलादेश आणि यूएई यांच्यातील आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे.
भारताने गट ‘अ’मध्ये शानदार कामगिरी करत तिन्ही सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. पाकिस्तानने दोन विजयांसह दुसरे स्थान पटकावून उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे थायलंड आणि हाँगकाँग-चीनचे स्पर्धेतील आव्हान संपले आहे.
गट ‘ब’मध्ये श्रीलंकेने सहा गुणांसह अव्वल स्थान निश्चित केले आहे. इंडोनेशियाला तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील सामना या गटातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील संघाचा निर्णय करणार आहे.
दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन सामने खेळले असून प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात दोन-दोन गुण आहेत. बांगलादेशचा नेट रनरेट सध्या चांगला असला तरी आजच्या सामन्यातील विजयच सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे.
आज जो संघ जिंकेल, तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताशी सामना करेल. पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपेल.
सेमीफायनलचे समीकरण
🇮🇳 भारत 🆚 बांगलादेश/UAE — विजेता
🇵🇰 पाकिस्तान 🆚 🇱🇰 श्रीलंका
त्यामुळे महिला आशिया कपच्या अंतिम फेरीकडे जाणाऱ्या भारताच्या मार्गातील पुढचा अडथळा बांगलादेश असेल की UAE, याचा फैसला आजच्या निर्णायक सामन्यात होणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











