IIM Nagpur Recruitment 2026 : ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करा
भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर (IIM Nagpur) यांनी विविध प्रशासकीय व शैक्षणिक विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे ‘ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह’ पदांवर योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथील मुख्य कॅम्पसमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. तसेच, पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) धारक असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, शैक्षणिक किंवा प्रशासकीय कामांमध्ये, विशेषतः विद्यार्थी व्यवहार (Student Affairs) क्षेत्राशी संबंधित किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस सुईच्या (MS Office Suite) कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि संबंधित प्रमाणपत्र असल्यास उमेदवारास अतिरिक्त लाभ मिळू शकेल.
वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया
वयोमर्यादा: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड मुलाखत प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.
Important Information-
अर्ज फक्त ऑनलाइन माध्यमातूनच स्वीकारले जाणारत. इतर कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट व जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे बंधनकारक आहे.
अर्जाची अंतिम मुदत संपण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अचूक भरावी.
Eligibility / Dates / Fees / Documents / Application Process
तपशील-माहिती
पदाचे नाव-ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (Junior Executive)
शैक्षणिक पात्रता-पदवी (पदव्युत्तर पदवी धारकांना प्राधान्य) आणि ३ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा-कमाल ३५ वर्षे
नोकरीचे ठिकाण- नागपूर
अर्ज सुरू होण्याची तारीख- २६ सप्टेंबर २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख-१० ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)
अर्ज करण्याची पद्धत-ऑनलाइन
निवड पद्धत-मुलाखत
महत्वाच्या लिंक्स:
Notification (जाहिरात PDF)- https://www.iimnagpur.ac.in/junior-executive-regular-obc-2/
Official Website(अधिकृत वेबसाईट)-
https://www.iimnagpur.ac.in/
Online Apply (ऑनलाईन अर्ज)-https://iimnagpurnt.samarth.edu.in/index.php/site/login
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर (IIM Nagpur) मधील ही नोकरीची संधी उच्च शिक्षण क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुकांनी कोणतीही अंतिम मुदत चुकवण्यापूर्वी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











