26 देशांमध्ये गाजणारा मराठमोळा ब्रँड! बाजारातली गरज ओळखली अन् केली सुरुवात, उभारली शेकडो कोटींची कंपनी
जगभरातील हिंदू धर्मियांच्या देव्हाऱ्यात तांबा आणि पितळाच्या भांड्यांना विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत वापरात असलेल्या या भाड्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी आधी राख, चिंच तसेच लिंबाचा पर्याय होता.
या पदार्थांच्या सहाय्याने भांडी घासून तांबे-पितळ उजळून निघायचे. परंतु याच पद्धतीला सोपे करण्यासाठी 1980 च्या दशकात महाराष्ट्रातील रविंद्र प्रभूदेसाई यांनी त्यांचे वडील वामनराव प्रभुदेसाई यांच्या मदतीने पितांबरीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अशा पावडरची निर्मिती केली ज्याच्या सहाय्याने आज देशातील लाखो घरातील तांबा-पितळाची भांडी उजळून निघत आहेत.
मनात पितांबरी पावडरची कल्पना नेमकी आली कशी?
20व्या शतकापर्यंत तांब्या-पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी एकच पारंपरिक पद्धत होती. भांडीवर लिंबू किंवा चिंच घासणे किंवा राख घासून भांडी स्वच्छ करणे. तांब्या-पितळाची भांडी स्वच्छ करण्यासाठी लागणारे त्याकाळचे कष्ट पाहता प्रभुदेसाईंना एखादी पावडर तयार करण्याची संकल्पना सुचली.
मुंबई-पुण्यापासून केली सुरुवात
आजच्या घडीला 26 देशांमध्ये पोहचलेल्या पितांबरीची सुरुवात मुंबई-पुण्यासारख्या महानगरात झाली. सुरुवातीला कंपनीने भांडी चमकवणारी पावडर, स्टील पावडर तसेच डिशवॉश बार अशी उत्पादने बाजारात आणली. मुंबई-पुण्यात या उत्पादनांची मोठी विक्री झाली. पुढे कंपनीने इतर राज्यांमध्ये विस्तार केला.
कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून उत्पादनांमध्ये विस्तार केला
फक्त भांडी घासण्याच्या पावडरीपासून सुरुवात केलेल्या पितांबरीने आज उत्पादनात वाढ केली आहे. आजच्या घडीला पितांबरीचे 70 पेक्षा जास्त उत्पादन बाजारात विकले जातात. कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून हेल्थकेअर, होमकेअर, अन्न, पूजा सामाग्री आणि शेती क्षेत्रात उत्पादन विस्तारले. आता फक्त भारत नव्हे तर तब्बल 26 देशांमध्ये पितांबरीचे उत्पादन विकले जातात.
कंपनीचा वितरण नेटवर्क आणि अर्थव्यवस्था
पितांबरी कंपनीचे भारतभरात जवळपास 2500 वितरक कार्यरत आहेत. तसेच 3.5 लाखांहून अधिक दुकाने आहेत. एकंदरीत कंपनीचे उत्पादन आता केवळ राज्यभरात नव्हे तर देशभरात विकले जात आहेत. या विस्ताराचा नफा कंपनीच्या महसुलात ठळकपणे दिसून येतो. अर्थ वर्ष 2025 मध्ये कंपनीची एकूण उलाढाल जवळपास 334.2 कोटी रुपये इतकी होती.
मराठी माणसाचा व्यवसाय साता समुद्रा पार !
रविंद्र प्रभूदेसाई यांनी जगाला दाखवून दिले की मराठी माणूस व्यवसाय करूही शकतो आणि व्यवसाय क्षेत्र गाजवूही शकतो. आजच्या काळात 26 देशांमध्ये विस्तारलेले पितांबरी साम्राज्याचे नेटवर्क आणि त्यामागचे कष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणास्रोत आहे.
जळगावसाठी प्रभू देसाईंनी निवड केली ती तरुण दिव्यांग उद्योजक श्री.महेश कुलकर्णी यांची
जळगाव शहरात पितांबरीचे सर्व उत्पादने एका छताखाली मिळण्यासाठी प्रभुदेसाईंनी समाजातील अतिशय तळागाळातील लोकांचा विचार करून तरुण उद्योजक श्री.महेश कुलकर्णी यांच्या कौस्तुभ इंटरप्राईजेस, जहागीरदार हाईट्स , मोहाडी रोड जळगाव येथून निवड केली आहे. ते गेली दोन वर्षांपासून कंपनीचे उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











