Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 8, 2026
in india - world
0
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन झाल्याची माहिती आहे. नाना यांच्या अकाली एक्झिटने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर म्हणजेच नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतील हे एक दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू करत त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि खास शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये नाना पाटेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं ? गोव्यात निधन ! 

HTML img Tag Simply Easy Learning

आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर यांचं आज वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं आहे.

गुरूवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी येताच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. गोव्यातील त्यांच्या घरी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना दोनापावला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 5:20 वाजता त्यांचे निधन झालं.

हृदयविकाराचा तीव्र झटका अन्…

गोव्यातील नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना 45 मिनिटं वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांना 45 मिनिटे सीपीआर देण्यात आला, परंतु त्या संपूर्ण काळात त्यांच्या हृदयाची हालचाल पुनरुज्जीवित होऊ शकली नाही अन् 5:20 वाजता त्यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांचं पोस्ट मॉर्टम केलं जाणार आहे.

निवासस्थानी वैद्यकीय पथक पाठवलं

मृत्यूचं कारण वैद्यकीयदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या निश्चित करण्यासाठी पोस्टमॉर्टेम आवश्यक ठरू शकते असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एक वैद्यकीय पथक पाठवण्यात आले होते. घटनास्थळीच ‘कार्डियाक मसाज’ देण्यात आला आणि त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे.

सिंहगड पायथ्याजवळ डोणजे गावात अंत्यसंस्कार

नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर सिंहगड पायथ्याजवळ असलेल्या डोणजे गावात त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार होणार आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आलीये. गोव्याहून पार्थिव एअरलिफ्ट करून पुण्यात आणलं जाणार आहे.

तीव्र वेदना, घरीच कार्डियाक मसाज. नाना पाटेकर यांच्यासोबत शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

काल रात्रीपर्यंत एकदम ठणठणीत असलेल्या नाना पाटेकर यांना नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाले.

अभिनेते नाना पाटेकर यांना वैद्यकीय पथकाने सकाळी ५:२० वाजता मृत घोषित केले. काल नाना पाटेकर हे गोव्यातील त्यांच्या घरी होते. त्यांच्या अचानक छातीत तिव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर वैद्यकीय पथकाला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले होते.

ते घरात बेशुद्ध अवस्थेच आढळले होते. त्यांना घरातच कार्डियाक मसाज देण्यात आली आणि त्यानंतर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सकाळी ५:२० वाजता त्यांना मृत घोषित केले. हे प्रकरण वैद्यकीय-कायदेशीर स्वरूपाचे असल्याने, आज शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराची नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती पण त्यांचा दरारा देखील कायम होता. त्यांच्यासोबत काम करताना अनेक कलाकारांना थोडी भीती देखील वाटत असे. पण आता हेच नाना आपल्यामध्ये नाहीत याची कल्पनाही करता येत नाही. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनावर मुलगा मल्हारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला..

नानांच्या निधनाची माहिती मुलगा मल्हार पाटेकरने दिली. नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला असून चाहते आणि कलाकारांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवल्यानंतर वैद्यकीय पथकाला त्यांच्या गोव्यातील घरी बोलावण्यात आलं. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. 

कुटुंब गोव्यासाठी रवाना झालं आहे

काही खासगी कामासाठी नाना गोव्यात होते. त्यांचं पार्थिव दुपारनंतर पुण्यात आणलं जाईल, अशी माहिती मल्हारने दिली. नानांच्या निधनाची माहिती मिळाली तेव्हा मल्हार आणि कुटुंबीय पुण्यात होते. मल्हारने असंही स्पष्ट केलं की, त्याच्याकडे यासंबंधित सविस्तर माहिती नाही. गोव्याला जाऊन संपूर्ण माहिती घेणार असल्याचं त्याने कळवलं आहे.

नाना पाटेकर हे केवळ अभिनेता नव्हते, तर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. गंभीर भूमिका असो, खलनायक असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेला स्वतःची छाप देण्याची त्यांची खास शैली होती. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘तिरंगा’, ‘अपहरण’, ‘राजनीती’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि लेखनही केलं. ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. नाना पाटेकर यांच्या आयुष्यात रंगभूमीचं स्थान विशेष होतं. काही दिवसांपूर्वी गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नट होण्याचा आपला प्रवास सांगितला होता. सुलभाताईंमुळे आपल्याला रंगमंचावर येण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच नाटकाला पुरस्कार मिळाल्यानंतर आपण अभिनयालाच आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला, अशी आठवण त्यांनी सांगितली होती.

नाना पाटेकरांचं मोठं योगदान

नाना पाटेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून 2015 मध्ये ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. नाम फाउंडेशन ही संस्था दुष्काळग्रस्त भाग, शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करते. महाराष्ट्राच्या अनेक भागात पाण्यासाठी नाना पाटेकरांचं मोठं योगदान होतं.

रंगभूमीपासून सिनेमापर्यंतचा प्रवास

नाना पाटेकर यांच्या अभिनयाची सुरुवात रंगभूमीपासून झाली. त्यांच्या अभिनयाची खरी जडणघडण मराठी रंगभूमीवरच झाली. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली.

यानंतरच्या काळात नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. हळूहळू त्यांच्या अभिनयाची वेगळी शैली प्रेक्षकांच्या लक्षात येऊ लागली.

‘सलाम बॉम्बे!’ आणि ‘परिंदा’मुळे मिळाली वेगळी ओळख

1988 मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं आणि समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र त्यानंतर आलेला 1989 चा ‘परिंदा’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीसाठी मोठा टप्पा ठरला.

या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘अण्णा’ ही व्यक्तिरेखा विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नाना पाटेकर यांच्या दमदार संवादांनी आणि भूमिका साकारताना व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरण्याच्या त्यांच्या शैलीने त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. यानंतर ते आपल्या अभिनयाच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत वेगळे अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

जिथे नाना पाटेकरांचं होतं जिव्हाळ्याचं नातं, त्याच ठिकाणी होणार अंत्यसंस्कार; कुठं देणार अखेरचा निरोप?

नाना पाटेकरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकर यांच्या निधनाने रंगभूमी, सिनेसृष्टीवरच नव्हे तर समाजमनावरही शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांना २०१३ मध्ये पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

नाना पाटेकरांवर कुठं होणार अंत्यसंस्कार ?

नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘नानाची वाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच फार्महाऊसमध्ये नाना पाटेकर अनेक वर्षांपासून कुटुंबासह राहत होते. डोणजे येथील हे फार्महाऊस त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे ठिकाण होते. नाना पाटेकर यांनी या ठिकाणी शेती सुरू केली होती. त्याचे व्हिडीओदेखील अनेकदा समोर आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील नाना पाटेकर यांचे पार्थिव एअरलिफ्ट करून पुण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर डोणजे येथील शेतात अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली जात आहे .नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. मात्र, त्यावर अधिकृत माहिती समोर आली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. त्यांच्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक भान आणि साध्या जीवनशैलीमुळेही ते प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होते.

नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे.

जागतिक रंगभूमीवर मराठी कलाकाराचा हा प्रवास खरोखरच एक संस्मरणीय अशी उपलब्ध वर्षानुवर्ष आठवणीत राहील . या हरहुन्नरी कलाकाराला दैनिक मार्केट स्पेशलतर्फे वंदनीय भावपूर्ण श्रद्धांजली. 

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

आजचे राशिभविष्य, ८ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Next Post

नाना पाटेकरांना जैन इरिगेशनतर्फे अशोक भाऊंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली ; आठवणींचा केला उल्लेख

Next Post
नाना पाटेकरांना जैन इरिगेशनतर्फे अशोक भाऊंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली ; आठवणींचा केला उल्लेख

नाना पाटेकरांना जैन इरिगेशनतर्फे अशोक भाऊंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली ; आठवणींचा केला उल्लेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697