जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत
अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे नातेवाईक होते, जळगावहून धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावी परत जाताना अपघात झाला आहे.
जळगाव : जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिंमत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी हे तिघे कारने जळगावहून धरणगाव तालुक्यातील झुरखेडे या आपल्या गावी (Jalgaon Accident News) जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भयंकर होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेनंतर कार जागेवरच पूर्णपणे फिरली. तर कंटेनर उड्डाणपुलाच्या पुढील बाजूने खाली पडण्यापासून थोडक्यात (Jalgaon Accident News) बचावला. दरम्यान, पाळधी-तरसोद बायपास बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे.
त्यामुळे शहरातील अपघातांचा प्रश्न गंभीर बनला असून, मागील अडीच महिन्यांत आतापर्यंत १२ जणांचा अपघाती मृत्यू आहे. अपघाताची माहिती मिळताच मृत तरुणांच्या नातेवाईकांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली होती.(Jalgaon Accident News)
गावाकडे परतताना बांभोरी येथील पुलावर कार व कंटेनर यांची धडक झाली
तर मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधून झुरखेडा गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या या कारचा कंटेनरशी अपघात होऊन तिघांचाही मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी (१८ ऑक्टोबर) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास महामार्गावरील बांभोरी पुलावर झाला. पंकज प्रकाश चौधरी (३०), रवींद्र अरुण चौधरी (३०) व हरीश हिम्मत चौधरी (३२) (सर्व रा. झुरखेडा, ता. धरणगाव) अशी मयतांची नावे आहेत. भुसावळ जवळील वनवली येथे देवीच्या यात्रेत नातेवाईकाला सोडण्यासाठी तिघे जण कारने गेले होते. गावाकडे परतताना बांभोरी येथील पुलावर कार व कंटेनर यांची धडक झाली. यात तिघांना गंभीर दुखापत झाली.
तिघाही जणांना गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पाळधी आऊट पोस्टचे प्रभारी भूषण कोते यांच्यासह सहकारी पोहोचले होते. अपघातानंतर महामार्गावर लांबलचक रांगा लागल्या होत्या.(Jalgaon Accident News)
अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे नातेवाईक होते अशी माहिती आहे. जळगावहून धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावी परत जाताना हा अपघात झाला आहे; समोरून येणाऱ्या कंटेनरची कारला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. पाळधी-तरसोद बायपास बंद असल्याने अडीच महिन्यांत आतापर्यंत १२ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










