जळगाव ब्राह्मण सभेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ब्राह्मण समाजातील सर्वात जुनी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मण सभेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसह समाजाच्या एकजुटीबाबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी श्री मुकुंदराव धर्माधिकारी यांच्या नातवाने अतिशय सुंदर बासरी वादन सादर केले व त्यानंतर समाजातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेसमोरील आगामी काळातील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी समाजातील नागरिकांनी एकजूट होण्याची गरज यावर सभासदांनी सर्वानुमते चर्चा केली.
नवीन भव्य वास्तू उभारण्याची मागणी
जळगाव शहराचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता संस्थेच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन जागेचा शोध घेऊन आधुनिक व भव्य वास्तू उभारण्यात यावी, अशी मागणी सभासदांकडून करण्यात आली. या वास्तूमध्ये समाजोपयोगी विविध उपक्रम, कार्यक्रम आणि सामाजिक कार्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही विचार व्यक्त करण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जलद संपर्कावर भर
संस्थेतर्फे वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती सभासदांपर्यंत जलदगतीने पोहोचण्यासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष श्री. नितीन कुलकर्णी यांनी दिले.
सभेदरम्यान संस्थेचे चिटणीस श्री. अजय जोशी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. संदीप कुलकर्णी यांनी वर्षभराचा ताळेबंद अहवाल सभेसमोर सादर केला. सभासदांनी चर्चा केल्यानंतर हा अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यानंतर संस्थेतर्फे श्री. संजय जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप सौ. वैदही नाखरे यांनी पसायदानाने केला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अमोल जोशी, चिटणीस श्री. जितेंद्र याज्ञिक, कार्यकारिणी सदस्य श्री. मुकुंदराव धर्माधिकारी, श्री. उल्हास जोशी, श्री. अनिल जोशी, श्री. कमलाकर फडणीस, श्री. किरण कुलकर्णी, श्री. राजेश कुलकर्णी, श्री. हेमंत वैद्य, तसेच सौ. वैदही नाखरे, सौ. श्रद्धा कुलकर्णी, संस्थेचे व्यवस्थापक श्री. सचिन कुलकर्णी आणि देखभाल कर्मचारी श्री..अभिमान तायडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
सभेत झालेल्या चर्चेतून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी नवीन वास्तू, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर आणि समाजातील एकजूट या तीन प्रमुख बाबींवर विशेष भर देण्यात आला.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










