प्राध्यापक डॉ अरविंद सराफ यांच्या निधन
अमळनेर – येथील शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद गोपाळदास सराफ यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे.
शिक्षण, सामाजिक कार्य आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. ते अमळनेरच्या सराफ बाजाराचे माजी अध्यक्ष तसेच मंगळ ग्रह मंदिराचे संस्थापक होते .त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रासह अमळनेरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.. ते अमळनेर येथील सीनियर सिटीझन क्लबचे अध्यक्ष होते
सराफ कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही मनःपूर्वक सहभागी आहोत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏 ॐ शांती! शांती! शांती! 🙏
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










