आजचे राशिभविष्य, ५ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
मेष – आपल्या आक्रमक स्वभावाला आवर घालणे आवश्यक आहे. घरातील वाद-विवाद घरातच राहू द्या . आर्थिक व्यवहार चांगले होतील व फायदे होतील. कुटुंबियातील मतभेद दूर करा.
वृषभ – अधिक श्रम अधिक फायदा या न्यायाने आपण नेहमीच काम करत असता.त्याचा तुम्हाला आजही फायदा होईल. कार्यक्षेत्र वाढवणे आवश्यक आहे.
मिथुन – उद्योग व्यवसायात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. व्यवसायामध्ये कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते ,मात्र नियोजन पूर्वक काम करा. मनोरंजनावर नियंत्रण हवे.
कर्क – मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल, मात्र सुरुवातीला महत्त्वाची कामे उरकून घ्या. ती सहजतेने होतील आपणास हत्त्वाच्या कामात सहकार्यांचे सहकार्य लाभेल.
सिंह – शुभ ग्रहांची साथ ही आपली जमेची बाजू आहे.मात्र आपले अंदाज चुकत नाहीत याची खात्री करून घ्या.महत्त्वाचे निर्णय घ्याल तडजोडीची आवश्यकता आहे.
कन्या – शिक्षण क्षेत्राशी संबंधित येईल, किंवा तिथे नवीन संधी प्राप्त होतील. संधीचे सोने करण्याचा दिवस आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या निर्णय योग्य होईल.
तुळ – आज कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील तर त्यात निश्चित यश येईल. मात्र लॉटरी सट्टा यांच्या नादी लागू नका. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न चालले असतील.
वृश्चिक – आपल्या कलागुणांना वाव मिळणार आहे. लहान-सहान घटनांना अधिक महत्त्व न देता मार्गक्रमण करत रहा. अधिकाराचा योग्य वापर करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
धनु – मनोबल खूप चांगले असणार आहे, काम करताना उत्साह व आनंद वाटणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रांमध्ये महत्वाची भूमिका साकारालं प्रतिष्ठा वाढणार आहे.
मकर – आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे कामाचा ताण आला तरी सातत्याने काम करावेलागणार आहे. मात्र मानसिकता सांभाळा.
कुंभ – व्यवसाय उद्योगांमध्ये छोट्या लाभासाठी महत्त्वाचे निर्णय बदलू नका. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या व स्वतःचा आवाका याचा नीट मेळ घाला आणि निर्णय घ्या.
मीन – आपण आपल्या मार्गाने वाल वाटचाल करणे फायदेशीर ठरेल. उद्योग-व्यवसायात विरोधकांना शह देण्यासाठी नवीन डावपेच आखावे लागतील. घरातील मतभेद घरातच ठेवा.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











