मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
बॉलिवूडचा अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
या कारवाईसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना माहिती दिली.
जुहू येथील पुष्पा नरसी पार्कजवळ रविवारी सायंकाळी ७ वाजता टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०९(१) व ३(५) आणि शस्त्र अधिनियमाच्या (आर्म्स अॅक्ट) कलम ३ व २५ अन्वये हा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत टायगर श्रॉफ बालंबाल बचावला, मात्र त्याचा चालक फिरदोश आणि उमेश चव्हाण नावाचा एक पादचारी गोळीबारात जखमी झाले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून या तिघांचाही शोध सुरू होता. त्याकरता सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या आरोपींनी अंधेरी रेल्वे स्टेशन गाठल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं होतं. त्यानुसार, पुढील तपासणी करून तिघांनाही अटक करण्यात आली. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आरोपींनी हल्ला केल्यानंतर ते आधी सूरतला गेले. तिथून त्यांनी पुणे-जयपूर ही ट्रेन पकडली. जयपूरकडे जात असताना मुंबई पोलिसांनी ट्रॅक करून राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांची मदत घेऊन कोटा येथून आरोपींना ताब्यात घेतलं.”
ते पुढे म्हणाले, “औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना मुंबईला आणलं जाईल. मुंबईला आणल्यानंतर पुढचा तपास होईल. अत्यंत वेगाने ही कारवाई पोलिसांनी केली आहे. कोणत्याही परिस्थिती याची पाळंमुळं शोधून काढल्याशिवाय मुंबई पोलीस थांबणार नाही.”
दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकजण अल्पवयीन असून रेहान नावाचा आरोपी अनिल पंडितच्या संपर्कात होता. हे तिन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होती, असं राजस्थान पोलिसांनी सांगितलं.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.












