Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
in entertainment
0
प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

कणखर पिता, बलिदानी पती आणि कर्तव्यदक्ष वकील; ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला जळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी-

पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची जन्मभूमी जळगाव असली, तरी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या ऐतिहासिक खटल्यामुळे मुंबई ही त्यांची प्रमुख कर्मभूमी ठरली. दहशतवादाविरुद्धचा लढा, न्यायव्यवस्थेवरील निष्ठा, कुटुंबासाठी केलेला त्याग आणि कर्तव्याप्रती असलेली अविचल बांधिलकी अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाला जळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातून ॲड. निकम यांच्या सार्वजनिक जीवनासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि त्यागाचे दर्शन घडते.

२६/११ दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यादरम्यान घडलेले अनेक प्रसंग, तपास आणि न्यायालयीन लढ्याशी संबंधित घडामोडी तसेच सर्वसामान्यांना फारशा माहिती नसलेल्या बाबी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. दहशतवादाविरुद्ध लढताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी बजावलेली भूमिका आणि देशहितासाठी केलेले कार्य यांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

दरम्यान, दहशतवादी पाकिस्तानचा खरा चेहरा ॲड. उज्ज्वल निकम यांनी जगासमोर आणला, असे मत त्यांचे सुपुत्र ॲड. अनिकेत निकम यांनी व्यक्त केले.

कर्तव्यनिष्ठ वकिलामागचा संवेदनशील माणूस!

ॲड. उज्ज्वल निकम यांची ओळख केवळ कठोर भूमिका घेणारे सरकारी वकील अशी नाही, तर कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा यांचा समतोल साधण्यासाठी संघर्ष करणारा एक संवेदनशील माणूस अशीही आहे. ‘प्रहार’ चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील याच भावनिक पैलूंना स्पर्श करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या खटल्यांमध्ये व्यस्त असताना त्यांना अनेकदा कौटुंबिक प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे लागले. त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई यांनी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी सामना करताना कुटुंबाला खंबीरपणे सावरले. पतीच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या, कुटुंबाची काळजी आणि स्वतःच्या आजाराशी सुरू असलेला संघर्ष अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला.

या कठीण काळात कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ज्योतीताईंचा त्याग आणि खटल्यात सहाय्यक म्हणून ॲड. अनिकेत निकम यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटातून अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका वकिलाच्या यशोगाथेपुरता मर्यादित न राहता, त्यामागे उभ्या असलेल्या कुटुंबाच्या त्यागाची कहाणीही सांगतो.

कसाबच्या खटल्यातील संघर्षाचे प्रभावी चित्रण

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला न्यायालयात दोषी सिद्ध करण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षासमोर होते. खटल्यादरम्यान कसाबने वेळोवेळी जबाब बदलून न्यायालयीन प्रक्रिया भरकटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ॲड. उज्ज्वल निकम यांनी उपलब्ध पुरावे, साक्षी आणि न्यायालयीन युक्तिवाद यांच्या आधारे खटला प्रभावीपणे लढवला.

या खटल्यातून दहशतवादी हल्ल्यामागील कट आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध जगासमोर आणण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट झाल्या. कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि पुढे ती अंमलातही आली.

या संपूर्ण संघर्षाची कहाणी ‘प्रहार’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. देशावरील संकटाच्या काळात कायद्याच्या चौकटीत राहून न्यायासाठी लढणाऱ्या वकिलाची जिद्द आणि त्याच्या कार्यामागील मानसिक बळ यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मराठी कलाकारांचाही महत्त्वपूर्ण सहभाग

‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट हिंदी भाषेत असून, त्यामध्ये मराठी कलाकारांचाही सहभाग आहे. ललित प्रभाकर आणि अजिंक्य देव यांसारख्या नामवंत मराठी कलाकारांमुळे चित्रपटात मराठी भाषेतील संवादांचाही अनुभव प्रेक्षकांना मिळतो.

अभिनेता राजकुमार राव याने ॲड. उज्ज्वल निकम यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. व्यक्तिमत्त्वातील कणखरपणा, न्यायालयीन लढ्यातील आत्मविश्वास आणि वैयक्तिक आयुष्यातील भावनिक संघर्ष असे विविध पैलू पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

जळगावात पत्रकारांसाठी विशेष शोचे आयोजन

जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. मानसीताई निलेश भोईटे आणि श्री. अरविंद देशमुख यांच्या सहकार्याने, तसेच पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम पत्रकार मित्र मंडळातर्फे रविवारी जळगावात या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शोला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲड. उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र ॲड. अनिकेत निकम यांनी चित्रपटाची पार्श्वभूमी विशद केली. तसेच उपस्थितांचे स्वागत करून ॲड. उज्ज्वल निकम यांच्या कार्याचा आणि २६/११ खटल्यातील त्यांच्या भूमिकेचा आढावा घेतला.

या विशेष शोच्या माध्यमातून पत्रकारांना ॲड. निकम यांच्या आयुष्यातील संघर्ष, देशाप्रती असलेली निष्ठा आणि कुटुंबाने केलेला त्याग यांचे दर्शन घडले.

‘प्रहार’ हा केवळ एका वकिलाच्या जीवनावरील चित्रपट नसून, न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीच्या जिद्दीची, कुटुंबाच्या त्यागाची आणि देशहितासाठी कर्तव्य बजावणाऱ्या माणसाच्या संघर्षाची कहाणी आहे. काळ्या कोटामागे दडलेला एक कणखर पिता, समर्पित पती आणि कर्तव्यदक्ष वकील प्रेक्षकांसमोर आणण्यात चित्रपटाला यश आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

‘प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस ! कणखर पिता, बलिदानी पती आणि कर्तव्यदक्ष वकील; ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित...

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697