
बीड (प्रतिनिधी) -बीडच्या परळीत जुन्या भांडणाचा राग आणि राजकीय वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. चांदापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका हॉटेलवर चहा पीत असताना अभिजीत नागेश कांबळे या तरुणाला गाठले नंतर त्याला लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात,पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणातील फिर्यादीने तक्रारीत नमूद केलेली बाब म्हणजे, मारहाण सुरू असताना नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलवरून “पायावर मारू नका, मुंडक्यावर मारा… त्याचं मुंडक माझ्याकडे आणा” असा आदेश दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात अभिजीत कांबळे याच्या फिर्यादीवरून नितीन रोडे, आनंद कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर उर्फ बन्नी, रोहन उर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरूप यांच्यासह इतरांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून परळी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.

अभिजीत नागेश कांबळे हा तरुण परळीतील भीमनगरचा रहिवासी आहे. तो गेल्या तीन-चार वर्षांपासून परळीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. नितीन रोडे हे देखील अजित पवार गटाचे नगरसेवक असून ते भीमनगरमधून निवडून आले आहेत. नितीन रोडे हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे सोशल मीडीयावर अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत. नितीन रोडे याने गेल्या वर्षांमध्ये दिवसांमध्ये राजकीय आशीवार्दाच्या बळावर परळीत स्वत:ची चांगलीच दहशत निर्माण केली असून तो अनेकांना त्रास देत असल्याची चर्चा आहे. नितीन रोडे मित्रपरिवार आणि डी कंपनी या दोन ग्रूपच्या माध्यमातून ते आपला कारभार परळीत चालवतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










