
जळगाव (प्रतिनिधी) –
भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर विश्वकर्मा योजना सेल यांच्या वतीने तसेच श्री. महेशजी वर्मा यांच्या सहकार्याने त्यांच्या मातोश्री सौ. पद्माबाई वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

प्रत्येकाच्या अंतर्मनात आईचे महत्व अनन्य साधारण असते. ज्याप्रमाणे आई आपल्या बालकांचे संगोपन हे अतिशय मनोभावे काळजीपूर्वक करत असते तसेच प्रत्येकाने तिच्या स्मरणार्थ एक झाड लावून त्या झाडाचे संगोपन हे काळजीपूर्वक करून अनुभवावे ही या उपक्रमाची साफल्यता आहे.
शहराची सात ते आठ लाख लोकसंख्या विचारात घेता प्रत्येकाने वर्षभरात किमान एक किंवा दोन झाडे लावली तरी वर्षाकाठी जळगाव शहरातच आठ ते दहा लाख झाडांचे वृक्षारोपण होऊ शकते तसेच त्यापैकी जास्तीत जास्त झाडांचे संगोपन हे योग्य पद्धतीने झाले तर पर्यावरणाला अतिशय पूरक फायदा होऊ शकतो अशा प्रकारच्या अभिनव उपक्रम सेवा इतर सेवाभावी संस्थांनी सुद्धा करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे..

या पर्यावरणपूरक उपक्रमाला उपस्थित राहून वृक्षारोपण करण्याचा आनंद लाभला.
यावेळी आ. राजूमामा भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष श्री. दीपक सूर्यवंशी, विश्वकर्मा योजना सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय विसपुते, श्री. विजय वानखेडे तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्षारोपण ही केवळ आजची गरज नाही, तर भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक आहे. चला, आपणही “एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेत सहभागी होऊन हरित, स्वच्छ आणि समृद्ध भारत घडवूया.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










