Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

” इराणसाठी नरकाचे द्वार उघडा” जॉर्डन मधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर संताप्त डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया; अमेरिकेचा इराणवर वर विध्वंसक हल्ला

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 20, 2026
in india - world
0
” इराणसाठी नरकाचे द्वार उघडा” जॉर्डन मधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर संताप्त डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया; अमेरिकेचा इराणवर वर विध्वंसक हल्ला
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Middle East Conflict)  दिवसागणिक  अधिक  वाढतच  असल्याचे चित्र आहे. अमेरिकी सैन्याने  पुन्हा  एकदा इराणवर हवाई (US Iran Conflict) हल्ले केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांना धोका निर्माण करणाऱ्या इराणच्या क्षमता कमकुवत करणे आणि जॉर्डनमधील अमेरिकी सैनिकांवर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. तर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM)  या संदर्भात  माहिती  दिली आहे. शनिवारी ईस्टर्न टाईमनुसार सायंकाळी 6 वाजता, राष्ट्राध्यक्षांच्या (Donald Trump) निर्देशानुसार हा हल्ला करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

US Iran Conflict:  अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सैन्याला पूर्ण मोकळीक

मध्यपूर्वेतील युद्ध शमण्याऐवजी अधिकच चिघळत असल्याचे दिसते. सलग अकराव्या दिवशी अमेरिका आणि इराणने एकमेकांच्या तळांवर हल्ले केले आहेत. पण या संदर्भातील सर्वात मोठी बातमी आता थेट व्हाईट हाऊसमधून येत आहे, जिथे जॉर्डनमध्ये दोन अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. इस्रायली वृत्तवाहिनी ‘चॅनल 14’ ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एक खळबळजनक दावा केला आहे की, ट्रम्प यांनी अमेरिकी सैन्याला इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने पेंटागॉन आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याला जॉर्डनमधील दोन अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. यापूर्वी, ट्रम्प यांनी या मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले होते आणि इराणला स्पष्ट इशारा दिला होता की वॉशिंग्टन तेहरानला अण्वस्त्रे मिळवण्याची कधीही परवानगी देणार नाही.


दरम्यान, ट्रम्प यांनी ‘न्यूजनेशन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणी हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या दोन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू ‘अत्यंत दुःखद’ आहे आणि वॉशिंग्टन इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही. इराण आता सामंजस्य कराराचे पालन करत नाही, या गोष्टीची आपल्याला पर्वा नाही, असेही ते म्हणाले.


इराणने जॉर्डनमधील एका अमेरिकी तळावर पुन्हा एकदा हल्ला केला. इराणने जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी हवाई तळावर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. तळावरून रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये क्षेपणास्त्रे थेट अमेरिकी लष्करी तळावर पडताना दिसत आहेत. इराणने अमेरिकेची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. इराणने सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या मुवफ्फाक साल्टी हवाई तळावर वारंवार हल्ले केले आहेत.

Middle East Conflict : जॉर्डनमध्ये दोन अमेरिकी सैनिक ठार, एक बेपत्ता

दरम्यान, 17 जुलै रोजी जॉर्डनमध्ये इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दोन अमेरिकी सैनिक ठार झाले. आणखी एक सैनिक अद्याप बेपत्ता आहे. सैनिकांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. लष्कराने म्हटले आहे की, त्यांच्या कुटुंबीयांना अधिकृत माहिती दिल्यानंतर 24 तासांनी त्यांची नावे जाहीर केली जातील.


US Iran Conflict: ठार झालेल्या अमेरिकी सैनिकांची एकूण संख्या 16, तर 430 हून अधिक सैनिक जखमी

अमेरिकी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर चार सैनिकांना उपचारासाठी जॉर्डनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्या चौघांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. किरकोळ जखमी झालेले इतर सैनिक उपचारानंतर कर्तव्यावर परतले आहेत. या घटनांमुळे युद्धाच्या सुरुवातीपासून ठार झालेल्या अमेरिकी सैनिकांची एकूण संख्या 16 झाली आहे, तर 430 हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला; मंत्रीपदाचा राजीनामा देणार का?; दिल्लीत वेगवान हालचाली

Next Post

महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन,वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रिकेट जगताला मोठा धक्का

Next Post
महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन,वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रिकेट जगताला मोठा धक्का

महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन,वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रिकेट जगताला मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697