राज्यात एफडीएची मोठी कारवाई; डॉमिनोज, KFC, मॅकडोनाल्डसह नामांकित ब्रँड्सवर छापे, २ आस्थापना तात्काळ बंद
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध’ मोहिमेअंतर्गत राज्यभर मोहीम राबवली. या मोहिमेत राज्यातील विविध विभागांमध्ये एकूण १०४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी २ व्यावसाय तात्काळ बंद करण्यात आले तर ९५ सुधारणा नोटिसा आणि ५ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले. या विशेष मोहिमेत डॉमिनोज पिझ्झा, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंग, स्टारबक्स, माँजिनिज या साखळी आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ही धडक मोहीम राबवण्यात आली. १० आणि ११ ऑगस्ट रोजी पुण्यासह मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले. मुंबई शहरातील विलेपार्ले, बोरिवली, घाटकोपरमधील आर सिटी मालमधील डॉमिनोज पिझ्झावर कारवाई करण्यात आली. राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करून भेसळ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.
आतापर्यंत ३ लाख २७ हजार ७१४ रुपये किंमतीचे १,१५० किलोग्रॅम दूध व दुग्धजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला,गुटखा विक्री प्रकरणी १५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून २५ लाख ९६ हजार ७२७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तपासणी दरम्यान एकूण १२० हॉटेल,रेस्टॉरंट, धाब्यांच्या तपासणी करून ५४ आस्थापनांना सुधारणा नोटिस देऊन ११ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
मुंबईतील दोन धाब्यांचे परवाने निलंबित
मुलुंड-गोरेगाव लिंक रोडजवळील मुंबई मेट्रो ढाबा आणि गुलसान द पंजाबी ढाबा या दोन धाब्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत या दोन्ही धाब्यांचा परवाना निलंबित करण्यात आला.
रायगडमध्ये ६९८ लिटर संशयित निकृष्ट दूध जप्त
रायगडमध्ये मातेश्वरी फूड्समध्ये ६९८ लिटर संशयित निकृष्ट दूध जप्त करण्यात आले. तसेच विना नोंदणी अन्न व्यवसाय केल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











