ब्राह्मण सभा जळगाव तर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ
मराठी मातृभाषिक महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजातील जळगावच्या ज्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी/मार्च २०२६ इ.५ वी व इ.८ वी च्या पुर्व माध्यमिक व माध्यमिक शासकीय शिष्यवृत्ती तसेच इ.१० वी, इ.१२ वी फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या परिक्षेत शेकडा ८०% गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. तसेच पदवी, पदविका व पदव्युत्तर परिक्षेत शेकडा ६०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले आहेत. तसेच सी.ए. प्रवेश परिक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व इ. १२ वी सायन्स नंतर इंजिनियरिंग सी.ई.टी. मध्ये सर्वाधिक गुण मिळविणारा विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष प्रावीण्य मिळविलेले आहे व ज्यांचेजवळ शासकीय अधिकारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आहे. इ.१२ वी ते पदव्युत्तर परिक्षेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना संस्कृत विषय सोडून १०० पैकी १०० गुण असणाऱ्या कोणत्याही एका विषयास १०००/- रूपयाचे बक्षीस रोख स्वरूपात यावर्षीपासून देण्यात येईल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. वरील प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ब्राह्मण सभा जळगावतर्फे करण्यात येणार आहे. त्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयातून छापील अर्ज घेऊन १ पासपोर्ट फोटो, गुणपत्रिकेची स्वप्रमाणित सत्यप्रत (झेरॉक्स) जोडून संस्थेच्या कार्यालयात (ब्राह्मण सभेत) दि.१०/०९/२०२६ पुर्वी कार्यालयीन वेळेत जमा करावे असे आवाहन ब्राह्मण सभा, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क (०२५७) २२२९९०२ (सकाळी ९ ते १२.३० व दुपारी ३.३० ते ७.३०), श्री. हेमंत वैद्य – मो. ७६२०८७८७६६ श्री. कमलाकर फडणीस मोः ९०९६३३३०९२, श्री. सचिन कुळकर्णी (व्यवस्थापक) -मो.७०२०५५९१३९
टिप – दि.१०/०९/२०२६ या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
आपला विश्वासु
हेमंत अरूण वैद्य.
निमंत्रक, विद्यार्थी गुण गौरव समिती, ब्राह्मण सभा, जळगाव. मो. ७६२०८७८७६६
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











