आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
मेष – आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने महत्त्वाची कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला अपेक्षित असलेले परदेशातून संदेश येतील.
वृषभ – दैनंदिन कामे सातत्याने पूर्ण करावी लागणार आहेत. मानसिक तणाव किंवा प्रकृती अस्वस्थ यामुळे काम करण्यास उत्साह नसेल. शत्रु पिडा होण्याची शक्यता आहे.
मिथुन – आजचा दिवस आपल्याला सावधतेने घालवावा लागणार आहे. आपला कामाचा वेग चांगला राहणार आहे. स्वतः लक्ष घालण्याचे महत्त्वाचे आहे.
कर्क – नवीन कामे मिळतील, पण त्याचा पूर्णपणे आधी आपण अभ्यास करून घ्यावा. अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, चिकाटी आणि सातत्य यांनी तुमची काम व्यवस्थित होतील.
सिंह – नवीन नवीन उपक्रम राबवाल. नवीन नवीन काम करण्यासाठी उत्साह राहणार आहे. आर्थिक व्यवहार चांगले होतील. कामे सातत्याने पूर्ण करा.
कन्या – आजचे ग्रह मान आपणासाठी अनुकूल आहे. सर्व दृष्टिकोनातून आपल्याला फायदेशीर होणार आहे. घरातील मोठे प्रश्न किंवा चिंता दूर करण्याचा मार्ग सापडतील.
तुळ – जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील, किंवा फोनवरून संपर्क साधला जाईल. छोटे-मोठे जे गैरसमज झाले आहेत ते दूर कराल.
वृश्चिक – आर्थिक विवंचना दूर होतील. शांत व तणावमुक्त रहाल. काम वेळेवर पूर्ण होतील कुठल्याही प्रकारची घाई गर्दी करू नका.
धनु – मरगळ दूर होईल उत्साहाने आनंदाने कामाला लागा. नवीन प्रस्ताव समोर येतील. योग्य प्रस्ताव निवडणे आपणास आवश्यक आहे. कामात अडचणी आल्या तरी त्या योग्य तऱ्हेने सोडवा.
मकर – आपल्यासमोर मोठे प्रस्ताव येणार आहे. व्यापार व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी आपणास गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यासाठी आपणास कर्ज हवे असल्यास ते मिळेल.
कुंभ – आपल्या कामांमध्ये चांगली प्रगती कराल. आपल्या अधिकाराचा वापर योग्य तर्हेने करून घ्या.आर्थिक व्यवहार मनासारखे होतील. आपल्या सहकार्यांचा पण लाभ करून द्याल.
मीन – महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल. कोणत्याही कामामध्ये घाई गर्दी करू नका नीट आणि शांतपणे कामे करा. कामे व्यवस्थित होतील.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











