
वृत्तसेवा- भारताची राजधानी दिल्लीत सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्याचे दिसून आलं. या ‘संसद मार्च’मध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष दिसून आला. जंतर-मंतरवरून आंदोलक संसदेच्या दिशेने निघताच पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. कालच्या आंदोलनातील या संघर्षात 100 हून अधिक पोलीस आणि आंदोलक जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे.

दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यानंतरही आंदोलक संसदेच्या दारात पोहोचले. आंदोलकांनी बॅरिकेट्स देखील तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला. आंदोलकांनी दगडफेक केली. सरकारी वाहनांची नासधूस केली, असा गंभीर आरोप देखील पोलिसांनी केला. कालच्या आंदोलनामुळे 118 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यात अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासहित इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत. यात अनेक महिला पोलीस अधिकारी देखील जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंदोलक देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आंदोलनादरम्यान सरकारी वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत 70 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीत कायदा हातात घेणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या लाठीचार्जवरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे.

दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘संसद मार्च’दरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या मोर्चाच्या हिंसाचारामागे कोणाचं षडयंत्र होतं का, याचाही तपास पोलीस करणार आहेत. पोलिसांनी 70 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. विविध परिसरातून आलेल्या तक्रारी वरूनही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आज मंगळवारी देखील आंदोलन करण्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे आज पोलीस कोणती भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










