Friday, August 28, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

सहा शासकीय रुग्णालयांतील जागा गुजराती संस्थेला; महायुतीचा प्रताप. धर्मशाळेच्या नावाखाली एक रुपया भुईभाडे. 49 वर्षांसाठी गिफ्ट

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 21, 2026
in maharashtra
0
सहा शासकीय रुग्णालयांतील जागा गुजराती संस्थेला; महायुतीचा प्रताप. धर्मशाळेच्या नावाखाली एक रुपया भुईभाडे. 49 वर्षांसाठी गिफ्ट
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

HTML img Tag Simply Easy Learning

वृत्तसेवा- सहा प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये धर्मशाळा/विश्रामगृह उभारण्यासाठी गुजरातमधील सेवादान आरोग्य फाउंडेशनला मोक्याच्या जागा देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. एक रुपया या नाममात्र दराने 49 वर्षांसाठी जागा दिल्या आहेत . या जागेवर संस्थेच्यावतीने रुग्णांच्या नातेवाईकांना निवासव्यवस्था , भोजन व्यवस्था , स्वच्छतागृह ना – नफा ना तोटा तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
मुंबईतील जे.जे रुग्णालय, नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय व वैद्यकीय महाविद्यालये, पुणे येथील बी. जे वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयांच्या परिसरात या अहमदाबादमधील सेवादान आरोग्य फाउंडेशनला धर्मशाळा उभारण्यासाठी वार्षिक एक रुपया नाममात्र दराने जागा दिली जाणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning


यापूर्वी याच संस्थेला गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड व राजस्थान या राज्यांत विविध शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्माशाळा, विश्रांतीगृहे उभारण्यासाठी जागा देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या शासकीय रुग्णालयात धर्मशाळा-विश्रामगृह उभारण्यात येणार आहे.
धर्मशाळांमधील सुविधा केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच दिल्या जातील. जागेचा अन्य कोणत्याही व्यावसायिक किंवा खासगी कारणासाठी वापर करता येणार नाही, अशी स्पष्ट अट सरकारने घातली आहे.


बांधकामाचा खर्च संस्थेवर धर्मशाळांचे बांधकाम, वित्तपुरवठा, सुसज्जीकरण, संचालन, देखभाल, स्वच्छता, सुरक्षा, मनुष्यबळ, विमा आणि आवश्यक परवानग्यांची जबाबदारी पूर्णपणे सेवादान आरोग्य फाउंडेशनवर सोपवण्यात आली आहे.
शासनाकडून जमीन उपलब्ध करून देणे आणि आवश्यक प्रशासकीय सहकार्य केले जाणार आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत धर्मशाळांचे बांधकाम पूर्ण करून त्या सुरू करणे संस्थेला बंधनकारक राहील. सामंजस्य करारानंतर तीन महिन्यांच्या आत सविस्तर प्रकल्प आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर करावा लागणार आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रकल्पाची प्रगती, सुविधा, शुल्क, तक्रार निवारण, अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षा आणि शासनाच्या अटींचे पालन यावर ही समिती नियमित देखरेख ठेवणार आहे. कराराची मुदत संपल्यानंतर किंवा करार समाप्त झाल्यास धर्मशाळेची इमारत, पायाभूत सुविधा आणि संबंधित मालमत्ता कोणताही मोबदला न देता सरकारकडे हस्तांतरित करण्याची अट घालण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन,वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रिकेट जगताला मोठा धक्का

Next Post

दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

Next Post
दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश ३० वर्षांहून अधिक काळ हिमालयाची भ्रमंती;...

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट सूरत : भाजपशी संबंधित स्थानिक...

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता? जळगाव : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट...

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697