
जळगांव (प्रतिनिधी) – येथील ॲक्युपंक्चर तज्ञ श्री.मोरेश्वर पाठक यांना रविवार, 19 जुलै रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA), आयुष ग्लोबल मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या समारंभात प्रतिष्ठेचा *‘महा ॲक्युपंक्चर रत्न’* पुरस्कार देऊन येथे सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री ॲड. नाझेर काझी व प्रसिद्ध सिने कलावंत मा. सुयोग गोऱ्हे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून, श्री.ॲड दत्तात्रय जाधवर , ऍड.श्री नागेश सोनूने, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन, डॉ.नितीन राजे पाटील, डॉ.सतीश कराळे, डॉ.बाबुराव कानडे (राष्ट्रीय अध्यक्ष) , सौ.दिशा चव्हाण, डॉ. अभिजीत कवटकर, डॉ. प्रशांत सावंत, श्री. धीरज मेश्राम, श्री विनोद ढोबळे, सौ.स्मिता खारकर, डॉ. राजेंद्र गोऱ्हे, सारंग फुके तसेच इतर मान्यवर व AIMA चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.ऍड.नाझेर काझी, सुयोग गोऱ्हे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सुवर्णा पाटील यांना सुध्दा ॲक्युपंक्चर थेरपीचा प्रचार-प्रसारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक ॲक्युपंक्चरिस्ट, थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील अनेक वर्षांपासून ॲक्युपंक्चर च्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसेवा सुरू ठेवली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर, निसर्गोपचार आदी सात चिकित्सा पद्धतींना एकत्रित घेऊन कार्य करणारी भारतातील एक मोठी संस्था आहे.

योगाचार्य श्री. विजय नवल पाटील, श्री.तुषार वाघूळदे व महिका खारकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.
मोरेश्वर पाठक यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगांव शहर, परिसर तसेच मित्रपरिवार कडून त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










