
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतर येथे आंदोलनस्थळाला आणि आंदोलकांना भेट दिली. मनोज जरांगे यांनी याआधीच या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.मनोज जरांगे यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंची भेट घेतली.
त्यांनी भेट घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी एक्सवर पोस्ट केले आहे की, “मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”
“जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.”

‘मारहाणीचे व्हीडिओ बघायला आमच्याकडे वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका’; सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रिया
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि पोलीस
दिल्लीत आंदोलनादरम्यान आंदोलकांना सुरक्षा दलांकडून मारहाण झाल्याच्या आरोपांसंबंधित याचिका सुनावणीसाठी घेण्यास भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिला असल्याचे वृत्त लाइव्ह लॉने दिले आहे.
दिल्ली येथील जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर हल्ला केला असे व्हीडिओ समोर आले आहेत. यासंदर्भात तातडीने प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली.
त्यावर उत्तर देताना, “आमचा वेळ वाया घालवू नका आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका,” असे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाचा उल्लेख करणाऱ्या वकिलांना सांगितले.

लाइव्ह लॉ ने दिलेल्या वृत्तानुसार, वकिलांनी सांगितले की, विद्यार्थी NEET परीक्षा योग्य पद्धतीने घेण्याची मागणी करत आहेत. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेत (NTA) सुधारणा करण्याची मागणीही करत आहेत. त्यावर त्यांचे बोलणे मध्येच थांबवत सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “खूप धन्यवाद.”
वकिलांनी सांगितले तीव्र पोलिसी कारवाईचे व्हीडिओ देखील उपलब्ध आहेत. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, “आम्हाला व्हिडीओंमध्ये रस नाही. ते पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही.”
याआधी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयानेही अशाच प्रकारच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. “न्यायालयाला यात ओढू नका,” असे न्यायालयाने म्हटले होते.
जखमी मुलीच्या प्रकृतीत सुधारणा
आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीच्या कथित घटनेत एक 21 वर्षीय तरुणी गंभीररीत्या जखमी झाली होती. त्या तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयाने दिली आहे.
रुग्णालायाने म्हटले आहे की तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले असून ती आता सामान्यपणे श्वास घेत आहे. ती शुद्धीवर असून डॉक्टरांच्या सूचनांना योग्य प्रतिसाद देत आहे. तिच्या मेंदू आणि मणक्याच्या एमआरआयचा अहवाल नॉर्मल आला आहे.
उपचार सुरू झाल्यापासून तिच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर सर्व आवश्यक उपचार सुरू आहेत.
या कथित घटनेच्या संदर्भात सध्या RML रुग्णालयात दाखल असलेली ती एकमेव रुग्ण आहे. तिच्यावर आवश्यक उपचार आणि सातत्याने वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

दिल्लीतील 16 मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)ने बुधवारी (22 जुलै) सकाळी 11.27 वाजता 16 मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली.
“ही मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. मात्र, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटेरिएट येथे इंटरचेंजची सुविधा उपलब्ध राहील.”
डीएमआरसीने बंद ठेवण्यात आलेल्या मेट्रो स्थानकांची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे. –
लोक कल्याण मार्ग
राजीव चौक
पटेल चौक
रामकृष्ण आश्रम मार्ग
बाराखंबा रोड
सुप्रीम कोर्ट
सेवा तीर्थ
जनपथ
मंडी हाऊस
सेंट्रल सेक्रेटेरिएट
आयटीओ
दिल्ली गेट
इंद्रप्रस्थ
खान मार्केट
जोर बाग
शिवाजी स्टेडियम
‘विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचा वापर देशविरोधी घटकांकडून गोंधळ माजवण्यासाठी केला जाऊ नये’ – प्रीती झिंटा
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत अभिनेत्री प्रीती झिंटाने प्रतिक्रिया दिली आहे. देशांतर्गत आणि परदेशातील काही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक विद्यार्थ्यांच्या संतापाचा आणि अडचणींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशी चिंता तिने व्यक्त केली.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










