Wednesday, October 21, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
in jalgaon
0
जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर!

अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन संपन्न

जळगाव दि.20 प्रतिनिधी : – “शब्दांना धार नव्हती आणि शाईत रक्त नव्हतं, पण आज जळगावच्या मातीने जे अनुभवलं, तो इतिहास लिहायला कदाचित शब्दही अपुरे पडतील!” श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जळगाव विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री दुर्गामाता महादौडीने’ आज, २० ऑक्टोबर रोजी जळगावच्या इतिहासात एका सुवर्ण पानाची नोंद केली. पहाटे ठीक ५:३० वाजता ‘श्री शिवतीर्थ’ कोर्ट चौकातून निघालेल्या या महादौडीत केवळ गर्दी नव्हती, तर तो धगधगत्या राष्ट्रभक्तीचा महापूर होता.

HTML img Tag Simply Easy Learning

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. नंतर त्यांच्या हस्ते भगवा ध्वजाचे पूजन करून पुष्प वृष्टी करण्यात आली. यावेळी रुपाली वाघ, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, पितांबर भावसार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

काळजात घर करणारे क्षण: गत जीवनातील मावळे पुन्हा जन्मले!

पहाटेच्या त्या काळ्याकुट्ट अंधारात, जेव्हा सबंध जग सुखाच्या झोपेत होतं, तेव्हा जळगावचे रस्ते ‘जगदंब, जगदंब’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या जयघोषाने थरथरले! कपाळावर चंद्रकोर, डोळ्यांत अंगार, हातात ताठ उभा असलेला भगवा झेंडा आणि अनवाणी पायाने रस्त्यावरून धावणारी हजारो तरुण पोरं… हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला आणि डोळे पाणावले. असं वाटत होतं की, साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी छातीचा कोट करून लढणारे छत्रपती शिवरायांचे तेच गत जीवनातील निष्ठावंत मावळे आज या जळगावच्या मातीत धारकऱ्यांच्या रूपाने पुन्हा जन्मले आहेत.

 “आजची उगवती पिढी जेव्हा मोबाईलच्या पडद्यावर आणि व्यसनाच्या दलदलीत स्वतःचं आयुष्य वाया घालवते आहे तेव्हा यात सहभागी मुलांना पहाटे उठवून त्यांच्या नसानसात राष्ट्रभक्तीचं रक्त सळसळवायला लावणारी ही संघटना आहे.

मातृशक्तीचा आणि बालगोपाळांचा अभूतपूर्व उत्साह

या महादौडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आईसाहेब जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या हजारो माता-भगिनी आणि लहान मुले यामध्ये सामील झाली होती. जळगावकरांनी घराघरांसमोर पायघड्या घालून अथांग रांगोळ्या काढून आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून या महादौडीचे स्वागत केले. जगदंब देवी मंडळात प्रांगणात जेव्हा हजारो धारकऱ्यांनी एका सुरात महाआरती केली तेव्हा जळगावची माती धन्य झाली. 

हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रमुख आकाश फडे, तालुका प्रमुख परीस महाराज, शहर प्रमुख विजय कासार, दौड प्रमुख योगेश्वर गुरुजी यांच्यासह असंख्य धारकऱ्यांनी महादौडच्या मार्गाची आणि संपूर्ण प्रशासकीय नियोजनाची तयारी अत्यंत देखणी व सुंदर केली होती

येत्या १ नोव्हेंबर ला आढावा बैठकीचे निमंत्रण दिले या वर्षीची मोहिम सांगली वरून गुरुजींनी निरोप दिला की श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड मार्गे पावनखिंड सर्व धारकरी पुढील मोहिमेच्या नियोजनात लागले.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

HTML img Tag Simply Easy Learning

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

Next Post

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

Next Post
56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

56.36 सेकंदांत रचला इतिहास! दीप्ती जीवनजीने सुवर्णपदकासह मोडला आशियाई पॅरा गेम्सचा विक्रम भारताची पॅरा अॅथलीट दीप्ती जीवनजी हिने आशियाई पॅरा...

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार ! 'जगदंब'च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला महादौडीत उसळला जनसागर! अशोक जैन यांच्या हस्ते ध्वज पूजन...

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी!

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी! जुन्या बसस्थानकासमोर मध्यरात्री थरार; ३५ वर्षीय महिला जखमी, भावासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव...

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी गुजरातच्या एका तरुणाने १२ ऑक्टोबर रोजी हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा कड्यावरून उडी...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 21, 2026
0

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे...

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ?

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

विजयादशमीचा दिवस ठरणार खास ! मूलांक ७ आणि ८ च्या नशिबात मौजमजेचा योग, वाचा तुमच्या नशिबात काय ? आज दसरा...

“बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास”, गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

"बायकोच्या छळामुळे मानसिक त्रास", गुजरातच्या तरुणाने हरिश्चंद्र गडावरून मारली उडी, १३ मिनिटांचा VIDEO व्हायरल गुजरातच्या एका तरुणाने १२ ऑक्टोबर रोजी...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 20, 2026
0

आजचे राशिभविष्य, २० ऑक्टोबर २०२६ :  तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपल्या महत्वाच्या कामांना क्रमवारी द्या, त्याप्रमाणे कार्य करा. कुठल्याही...

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस !

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

‘प्रहार’ने दाखवला काळ्या कोटातील उज्ज्वल माणूस ! कणखर पिता, बलिदानी पती आणि कर्तव्यदक्ष वकील; ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित...

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!