ST ने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी, NCMC कार्ड नसलेल्यांनाही मिळणार 50 टक्के सवलत
राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सलवत देण्यात येते. विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांसाठी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार आता महिला तसेच ज्या वृद्ध व्यक्तींचे 65 हून अधिक वय आहे, अशा प्रवाशांना एसटी भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येते. पण, अलीकडच्या काळात सरकारने एसटीचा हा लाभ मिळवण्यासाठी नवा नियम लागू केला. त्यामुळे आता 50 टक्के योजनेचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात आली. 1 सप्टेंबर 2026 पर्यंत देण्यात आली होती. याबाबत आता नवीन घोषणा करण्यात आली आहे.
माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली. NCMC कार्डच्या सक्तीवरून ते म्हणाले की, “शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी बसमधून प्रवास करताना NCMC कार्डची सक्ती करण्यात आली आहे. कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ऐन गौरी-गणपती उत्सवाच्या काळात भाविक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये असे निर्देश दिले आहेत.” अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली.
नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार हे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन विभागाचे अधिकार आहेत. त्यामुळे आशिष शेलारांनी हा निर्णय जाहीर करण्याआधी त्यांच्याशी चर्चा केली होती का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा सक्तीचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय फिरवला होता. परिवहन मंत्र्यांनी 3 महिन्यांची मुदत दिली असताना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट एका वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आता या दुसऱ्या निर्णयासंदर्भात असाच प्रकार घडल्याने चर्चांना उधाण आले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











