Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

जनमततर्फे ‘सकल ज्ञान महोत्सव’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ५१

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 6, 2026
in jalgaon
0
जनमततर्फे ‘सकल ज्ञान महोत्सव’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ५१
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘सकल ज्ञान महोत्सव’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ५१ मान्यवरांचा सन्मान

जळगाव : जनमत प्रतिष्ठान आणि वेदांत एज्युकेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे ‘सकल ज्ञान महोत्सव’ पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तब्बल ५१ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास जळगावचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भुसावळच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, डायटचे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी विजय पवार, डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, रायसोनी कॉलेजचे प्राध्यापक रफिक शेख, अनुभूती विद्यालयाच्या रूपाली वाघ, ह.भ.प. ज्ञानेश्वर जळके महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

बदलत्या शिक्षणपद्धतीवर निळकंठ गायकवाड यांचे भाष्य

यावेळी शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व निळकंठ गायकवाड यांनी आजची शिक्षणपद्धती आणि बदललेली पालकांची मानसिकता या विषयावर आपले विचार मांडले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाबरोबरच पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

शिक्षणातील बदलांवर आमदार राजूमामा भोळे यांचे मत

आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या मनोगतात शिक्षणपद्धतीमध्ये काळानुरूप झालेल्या विविध बदलांचा उल्लेख केला. सेमी-इंग्रजीसारख्या शिक्षण पद्धतीतील बदलांमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नव्या संधी, तसेच शिक्षण क्षेत्रातील पूर्वीच्या धोरणांबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या काही चुकांचा उल्लेख करत भाजप सरकारने शिक्षण क्षेत्रातील काही बाबींवर लक्ष केंद्रित करून सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

‘शिक्षक हा समाजाचा भक्कम आधारस्तंभ’

ह.भ.प. ज्ञानेश्वर जळके महाराज यांनी शिक्षकाचे समाजातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा व्यक्ती नसून समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या समृद्धतेवर आणि परिपक्वतेवरही त्यांनी भाष्य केले. समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मातृभाषेचे महत्त्व कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक हा समाजाचा भक्कम पाया आणि आधारस्तंभ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक महाकुंभासाठी सहकार्याचे आश्वासन
जनमत फाउंडेशनतर्फे २५ ते २८ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या शैक्षणिक महाकुंभ उत्सवाला आमदार राजूमामा भोळे यांनी यावेळी भरभरून मदत करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी आयोजकांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

दैनिक मार्केट स्पेशलचा विशेष सन्मान

1998 पासून 2026 पर्यंत वृत्तपत्र क्षेत्रात अतिशय खडतर प्रवास करणाऱ्या दैनिक मार्केट स्पेशल या वृत्तपत्राच्या कार्याला श्री. पंकज नाले यांनी पुरस्कृत करून सन्मानित केले. हा सत्कार दैनिक मार्केट स्पेशल च्या वतीने मुख्य संपादक श्री.हेमंत वैद्य यांनी स्वीकारला.

विविध क्षेत्रांतील ५१ व्यक्तींचा गौरव

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजातील तळागाळापासून उच्चभ्रू व्यावसायिक क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि फेटा देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या कार्याची दखल व्यापक स्तरावर घेतली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर, सन्मानार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनमतच्या हर्षाली ढाके व श्री.प्रवीण पाटील सर यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ५ सप्टेंबर २०२६च्या १० महत्त्वाच्या बातम्या

Next Post

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ७९ दिवसांनी नवा ट्विस्ट! सिया-चेतननंतर रितेश हिंगे पोलिसांच्या रडारवर

Next Post
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ७९ दिवसांनी नवा ट्विस्ट! सिया-चेतननंतर रितेश हिंगे पोलिसांच्या रडारवर

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ७९ दिवसांनी नवा ट्विस्ट! सिया-चेतननंतर रितेश हिंगे पोलिसांच्या रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697