Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

सगळ्यांना धडाधड पाडत पाठीमागून मोठा ट्रक आला अन् अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत घडला थरकाप उडवणारा प्रसंग

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 14, 2026
in maharashtra
0
सगळ्यांना धडाधड पाडत पाठीमागून मोठा ट्रक आला अन् अंगावरुन गेला; माऊलींच्या पालखीत  घडला थरकाप उडवणारा प्रसंग
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी राज्याच्या  विविध भागातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीला गालबोट लावणारी एक घटना आज (13 जुलै) सकाळी घडली आहे. जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रकचा भीषण अपघात झाला.या  दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. अपघातात सात वारकरी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एका जखमी वारकऱ्याला उपचारासाठी पुण्याला हलवलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

सदर ट्रक नांदेडचा असून मृत महिला वारकरी या सांगलीच्या होत्या. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील आहेत.वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. ट्रक ड्रायव्हरने तापाच्या गोळ्या घेतल्यानं त्याला ग्लानी आली. त्यानंतर ड्रायवरचा ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली.

वारीत नेमकं काय घडलं?
वारीत नेमकं काय घडलं, याची माहिती जखमी महिलेने बोलताना दिली. पाठीमागून मोठा ट्रक  अंगावर आला. आम्ही साईडने चाललो होतो. सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गाडी निघून गेली. तीन जण मयत पावले असं समजले, असं प्रत्यक्षदर्शी आणि जखमी महिलने सांगितले.

तीन वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू-

१) नंदा पवार, वय 60, कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
२) माधवी राजाराम सलगरे, वय 55, मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
३) राजश्री शंकर भोसले, वय 55, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली

जखमी झालेल्या वारकऱ्यांची नावं-

१) अक्काताई बबन कोळी, रा.शिरगाव,जि. सांगली
२) शांता शिवप्पा अलकोपर, रा.मिरजवाडी, जि. सांगली
३) कासाबाई जगन्नाथ गस्ते, रा.आष्टा, जि. सांगली
४) लक्ष्मी विठ्ठल गडदे, रा.नांगोळे,जि.सांगली
५) शैलजा दिनकर जगताप, रा.कवलापूर, जि.सांगली
६) मंगल विलास पाटील, रा.कवलापूर, जि. सांगली

मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत-

पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातात 3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी-

आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

मार्केट स्पेशल समूहाचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण

Next Post

जलगाव मे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव भव्य आयोजन

Next Post
जलगाव मे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव भव्य आयोजन

जलगाव मे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव भव्य आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697