Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

आमदारांचं पेन्शन बंद? सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश; निवृत्त आमदारांना दरमहा मिळणारी पेन्शनची रक्कम पाहून व्हाल थक्क

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 11, 2026
in india - world
0
‘हे प्रकरण असंच सोडणार नाही!’ नीट पेपरफुटीवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा; केंद्राला मोठे आदेश
0
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदारांचं पेन्शन बंद? सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश; निवृत्त आमदारांना दरमहा मिळणारी पेन्शनची रक्कम पाहून व्हाल थक्क

माजी आमदारांना पेन्शन व अन्य निवृत्तीनंतरचे लाभ देणाऱ्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत यावर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर मागितले आहे.

उत्तर प्रदेश राज्य विधानमंडळ सदस्यांचे वेतन, भत्ते व पेन्शन अधिनियम, 1980 ला आव्हान देणारी जनहित याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळल्यानंतर अपिलात हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारत सरकारकडून प्रतिसाद मागवला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

याचिका करणाऱ्यांचं म्हणणं काय?

‘लोक प्रहरी’ या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेचा मुख्य आधार घटनेतील अनुच्छेद 195 आहे. यानुसार राज्य विधानमंडळाला आपल्या सदस्यांचे वेतन व भत्ते निश्चित करण्याचा अधिकार आहे. मात्र, याचिकाकर्त्यांच्या मते, यात माजी सदस्यांना आयुष्यभर पेन्शन देण्याचा अधिकार नाही. लोकप्रतिनिधी स्वतःच्या कार्यकाळानंतरचे आर्थिक लाभकायद्याद्वारे निश्चित करू शकत नाहीत असा युक्तिवादही करण्यात आला आहे. या संस्थेने उत्तर प्रदेश राज्य विधानमंडळ सदस्यांचे वेतन, भत्ते व पेन्शन अधिनियम, 1980 मधील तरतुदींना आव्हान दिले होते. या कायद्यानुसार माजी आमदार आणि विधानपरिषद सदस्यांना आयुष्यभर पेन्शन, कौटुंबिक पेन्शन, मोफत प्रवास, वैद्यकीय सुविधा आणि इतर लाभ मिळतात.

निवृत्त आमदारांना किती पेन्शन मिळतं?

उत्तर प्रदेश राज्य विधानमंडळ (सदस्यांचे वेतन, भत्ते व पेन्शन) अधिनियम, 1980 नुसार माजी आमदारांना (निवृत्त आमदार) आयुष्यभर पेन्शन मिळते. 2025 मध्ये या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सध्याची पेन्शन रक्कम पहिल्या कार्यकाळानंतर पाच वर्षे पूर्ण झाली नसली तरीही दरमहा 35 हजार रुपये इतकी आहे. त्यानंतरच्या प्रत्येक पूर्ण झालेल्या वर्षासाठी अतिरिक्त दोन हजार रुपये मिळतात. उदाहरण सांगायचे झाले तर पाच वर्षे आमदार राहिल्यास: 35 हजार + (4 × 2000) = 43 हजार रुपये दरमहा मिळतात. म्हणजेच 10 वर्षे आमदार राहिल्यास पेन्शनमध्ये आणखी वाढ होते.

याशिवाय माजी आमदारांना दरवर्षी दीड लाख रुपये किंमतीचे रेल्वे कूपन मिळतात. वैद्यकीय सुविधा आणि इतर काही लाभही माजी आमदारांना मिळतात. ही पेन्शन आयुष्यभर चालू राहते. एकदा आमदार झाल्यानंतर म्हणजेच शपथ घेतल्यानंतर ते यासाठी पात्र ठरतात.

सर्व राज्यांवर परिणाम

अलाहाबाद हायकोर्टाने मे 2026 मध्ये ही याचिका फेटाळताना 1980 च्या कायद्यातील तरतुदींना घटनाबाह्य ठरवण्यास नकार दिला. याचिकेच्या अंतिम निर्णयाचा परिणाम उत्तर प्रदेशाबरोबरच देशभरातील राज्यांवर होऊ शकतो. कारण अनेक राज्यांत अशाच प्रकारच्या पेन्शन योजना आहेत. महाराष्ट्रातही अशाच तरतुदीला नागपूर खंडपीठात आव्हान दिले गेले आहे, जिथे एक दिवस आमदार राहिल्यावरही आयुष्यभर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे.

याचिकेमधील महत्त्वाचे मुद्दे

आमदारकीचा कार्यकाळ फक्त पाच वर्षांचा असतो, पण पेन्शन आयुष्यभर दिली जाते.

घटनेच्या अनुच्छेद 195 मध्ये फक्त विद्यमान सदस्यांच्या पगार आणि भत्त्यांची तरतूद आहे.

माजी सदस्यांना आयुष्यभर पेन्शन देण्याचा स्पष्ट अधिकार नाही.

लोकप्रतिनिधी स्वतःच्या कार्यकाळानंतरचे आर्थिक लाभ स्वतःच ठरवू शकत नाहीत.

सार्वजनिक पद हे जनसेवेसाठी आहे, वैयक्तिक फायद्यासाठी नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

बँकिंग होणार सुपर-सिक्योर! C-DAC आणतंय हॅकर्सना चकवणारं नवं तंत्रज्ञान

Next Post

दिवाळीची सुट्टी यंदा शिक्षकांची प्रशिक्षणातच जाणार; जनगणना ड्युटीमुळे प्रशिक्षण लांबले

Next Post

दिवाळीची सुट्टी यंदा शिक्षकांची प्रशिक्षणातच जाणार; जनगणना ड्युटीमुळे प्रशिक्षण लांबले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697