Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

तुकाराम मुंढेंनी उघड केली खासगी रुग्णालयांतील लूट! ११ रुपयांची सलाईनची नळी ३२५ रुपयांना; केंद्र सरकारला पत्र लिहीत म्हणाले..

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
September 16, 2026
in maharashtra
0
तुकाराम मुंढेंनी उघड केली खासगी रुग्णालयांतील लूट! ११ रुपयांची सलाईनची नळी ३२५ रुपयांना; केंद्र सरकारला पत्र लिहीत म्हणाले..
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुकाराम मुंढेंनी उघड केली खासगी रुग्णालयांतील लूट ! ११ रुपयांची सलाईनची नळी ३२५ रुपयांना ; केंद्र सरकारला पत्र लिहीत म्हणाले..

तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता थेट सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे…… 

रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी रुग्णालये कशी अवाढव्य कमाई करतात, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी केलेला ‘IV सेट’ (सलाईनची नळी) रुग्णांच्या माथी तब्बल ३२५ रुपयांना मारला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी आणि विक्री किमतीत तब्बल २,८४१ टक्क्यांपर्यंतचा नफा कमावला जात असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाहणीत आढळले आहे. यावर तीव्र आक्षेप घेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी’ (NPPA) आणि औषध विभागाला पत्र लिहून या प्रकारावर तातडीने नियमन आणण्याची आणि ‘ट्रेड मार्जिन’वर मर्यादा घालण्याची शिफारस केली आहे.


रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत वैद्यकीय उपकरणांवर हजारो टक्क्यांची नफेखोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या सर्वेक्षणात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

नेमकी कशी होतेय रुग्णांची लूट? (सर्वेक्षण काय सांगते?)

महाराष्ट्र एफडीएने राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या खरेदी किमती आणि रुग्णांकडून वसूल केल्या जाणाऱ्या कमाल किरकोळ विक्री किमतींची सखोल पडताळणी केली.

यामध्ये खालीलप्रमाणे विदारक चित्र समोर आले:

1) सलाईन सेट (IV Infusion Set): रुग्णालयांना मिळणारी खरेदी किंमत ₹११.०५; मात्र रुग्णांकडून थेट ₹३२५ उकळले जातात. (२,८४१% वाढ)

2) सिरिंज (Syringe): अवघ्या ₹६.७५ ला मिळणाऱ्या सिरिंजची छापलेली किंमत (MRP) ₹५७.२० लावण्यात आली आहे.

3) कॅथेटर (Catheter): ₹२९.४१ खरेदी किंमत असलेल्या या उपकरणासाठी रुग्णांना ₹३१० मोजावे लागत आहेत.

4) इतर उपकरणे : ऑक्सिजन मास्क, नेब्युलायझर यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींमध्येही हजारो टक्क्यांची तफावत आढळून आली आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले ?

या विषयावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर आपली भूमिका मांडताना तुकाराम मुंढे यांनी लिहिले, ‘रुग्णालयातील बिलाचा सर्वात महागडा भाग तो असतो, ज्याचा थेट उपचारांशी संबंध नसतो. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाला औषध किंवा उपकरणाची मूळ किंमत काय आहे आणि त्याच्याकडून किती नफा वसूल केला जातोय, हे जाणून घेण्याचा अधिकारच उरलेला नाही. हा माहितीचा अभाव (Information Gap) म्हणजेच सार्वजनिक आरोग्यापुढील मोठा धोका आहे.’
त्यांनी पुढे नमूद केले की, ‘अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर ‘औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३’ (DPCO) अंतर्गत मर्यादा असतात. परंतु बहुतेक वैद्यकीय उपकरणे या नियमावलीच्या बाहेर आहेत. त्यामुळे उत्पादक आणि वितरक अनियंत्रितपणे छापलेल्या किमती निश्चित करतात, ज्याचा अंतिम फटका रुग्णांना बसतो.’

केंद्राकडून आढावा सुरू; इतर राज्यांतूनही तक्रारी

केंद्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. उत्पादक आणि मध्यस्थ मध्यंतरीच्या काळात किती मार्जिन जोडतात, याचा आढावा घेतला जात आहे. विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रच नाही, तर पंजाब, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांतील औषध नियंत्रण अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारच्या नफेखोरीबाबत केंद्राकडे तक्रारी केल्या आहेत.

उपकरणांवर नियमावलीची गरज

कोरोनाच्या काळात केंद्रीय प्राधिकरणाने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि काही उपकरणांच्या मार्जिनवर मर्यादा आणल्या होत्या. त्याचप्रमाणे आता सर्वच वैद्यकीय उपकरणांवर संरचित मूल्य नियंत्रण लागू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दुसऱ्या बाजूला, रुग्णालयांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, नियमावली आणताना पारदर्शकता असावी; परंतु रुग्णालयांना मिळणारा नफा आणि पायाभूत सुविधांवरील खर्च यांचाही योग्य समतोल राखला गेला पाहिजे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील १५ सप्टेंबर २०२६च्या १० महत्त्वाच्या बातम्या

Next Post

Driving License असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मोबाईल नंबर अपडेट आहे का? घरबसल्या करा तपासणी

Next Post
Driving License असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मोबाईल नंबर अपडेट आहे का? घरबसल्या करा तपासणी

Driving License असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मोबाईल नंबर अपडेट आहे का? घरबसल्या करा तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697