‘माझ्यासमोर असली भाषा वापरु नका’; मत देणार नाही म्हणणाऱ्या युवकावर ज्योतिरादित्य शिंदे भडकले, लगेचच दिली ३ कोटींची भेट
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मध्य प्रदेशातील दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खराब रस्त्याच्या समस्येवरून काही तरुणांनी त्यांचा ताफा अडवून तक्रार केली. मंत्री आणि भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मध्य प्रदेशातील दौऱ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खराब रस्त्याच्या समस्येवरून काही तरुणांनी त्यांचा ताफा अडवून तक्रार केली.
यावेळी एका तरुणाने वेळेत रस्ता झाला नाही तर निवडणुकीत मत देणार नाही असा इशारा दिला. यावर ज्योतिरादित्य शिंदे संतप्त झाले आणि त्यांनी त्या तरुणाला कडक शब्दांत खडसावले. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
नेमका काय घडला प्रकार?
ज्योतिरादित्य शिंदे हे शुक्रवारी गुना येथील गुलाबगंज भागातून जात असताना स्थानिक नागरिक आणि तरुणांनी त्यांचा ताफा अडवला. खराब झालेल्या रस्त्याची तक्रार करत असताना त्यांनी लवकरात लवकर रस्ता तयार करण्याची मागणी केली आणि निवेदन दिले. या रस्त्यामुळे तब्बल ३० ते ३५ गावांतील नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याचे तरुणांनी सांगितले.
त्याच वेळी संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट, वेळेत रस्ता बनला नाही, तर तुम्ही मत मागायला आल्यावर आम्ही मत देणार नाही, असं म्हटलं.
शिंदेंचा संताप अन् दिला इशारा
हे ऐकताच ज्योतिरादित्य शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांनी तरुणाकडे बोट दाखवून म्हटले की, “माझ्याशी बोलताना कधीही अशा भाषेचा वापर करू नका. तुमचे काम निवेदन देण्याचे आहे आणि माझे काम सेवा करण्याचे आहे. समस्या मांडताना भाषेचे भान आणि मर्यादा राखली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

३ कोटींच्या निधीची तातडीने घोषणा
तरुणाला सुनावल्यानंतर शिंदे यांनी लगेचच परिसरातील नागरिकांना मोठी भेट दिली. गुलाबगंज ते कॅन्टोन्मेंट चौक या रस्त्याच्या बांधकामासाठी त्यांनी ३ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. मुख्यमंत्र्यांकडून विकासासाठी मिळालेल्या १५ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून या रस्त्याला प्राधान्य देण्यात आले आहे. शिंदे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याचा तांत्रिक आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. पावसाळा संपताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











