” ड्रायव्हर म्हणून नव्हे, घरातील सदस्य म्हणून स्वीकारलं “, नाना पाटेकरांच्या चालकाला अश्रू अनावर
अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी राहत्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून सिनेसृष्टीत स्वतःचं अस्तित्त्व निर्माण केलं होतं.
हिंदी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांत त्यांचं वर्चस्व होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने अवघी सिनेसृष्टी हळहळली आहे. दरम्यान, त्यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या चालकालाही आज अश्रू अनावर झाले. माध्यमांसमोर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
पुण्यातील डोणजे येथील नाना वाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा चालकही पुण्यातीलच आहेत. नाना पाटेकर येथे गणपतीचे दहा दिवस राहून गेल्याचं त्यांचे चालत यश पायगुडे यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले, अचानक वाईट गोष्ट घडली. साहेबांचं आणि आमचं नातं घट्ट होतं. त्यांनी कधीच आम्हाला ड्रायव्हर म्हणून वागवलं नाही, तर घरातील सदस्य म्हणूनच त्यांनी आम्हाला स्वीकारलं. आमचं नात घराच्या पलीकडचं नातं होतं.”
“पण आता आमचं दुःख शब्दांत सांगू शकत नाही. विश्वासही बसत नाहीय”, असं यश पायगुडे म्हणाले. “गणपतीमध्ये ते दहा दिवस येथे होते, तेव्हा बोलणं झालं होतं. आता आरामासाठी गोव्यात गेले होते”, असंही त्यांनी सांगितलं. तसंच साहेब गेल्याने आता डोक्यावरचा हात गेलाय, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
नाना पाटेकरांच्या घरी नेमकं काय घडलं ?
नाना पाटेकर यांना मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मित्राने मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णलायातून रुग्णवाहिका मागवली.
रुग्णवाहिकेबरोबर त्यांचं वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











