साहित्य जगत : ‘उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकातून खान्देशातील दीपस्तंभांवर प्रकाश, जळगावमध्ये प्रकाशन सोहळा संपन्न
भुसावळ येथील आनंदा पाटील यांनी ‘उजेड पेरणारी माणसं’ या ललित व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाची निर्मिती केली आहे.
त्यात खानदेशातील निवडक ८४ दीपस्तंभांचा धांडोळा घेतला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ बुधवारी जळगावात पार पडला. जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथील मराठी भाषा विभाग आणि प्रगतिशील लेखक संघ उत्तर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
बुधवारी सकाळी १० वाजता बेंडाळे महाविद्यालयातील धांडे सभागृहात हा कार्यक्रम झाला. पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे उपस्थित होते.
प्रगतिशील लेखक संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक डॉ. मिलिंद बागूल आणि उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न प्रा. दीपक पवार, बापूराव पानपाटील, प्रा. मेघा बारी, राजेंद्र पारे, प्रा. निकिता सोनवणे व ज्योती वाघ यांच्यासह आयोजन समितीने केले.

फोटो ओळ- भुसावळ येथील आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकाचे प्रकाशन करताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. सोबत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. नारखेडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, डॉ. मिलिंद बागूल व मान्यवर.
पुस्तक पोहोचले देश-विदेशात :
पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती २८ दिवसांत संपली. त्यानंतर या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी झाले. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक व परदेशातही हे पुस्तक पोहोचले आहे. शाळांमध्ये या पुस्तकाच्या सामूहिक रसग्रहणाचे कार्यक्रम सातत्याने होत आहेत. अंधारातील दीपस्तंभ उजेडात ‘उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकात वामनदादा कर्डक यांचा वैचारिक वारसा चालवणारे भीमशाहीर प्रतापसिंगदादा बोदडे, आंबेडकरी चळवळ समृद्ध करणारे दिलीप घोडेस्वार, देश-विदेशातील ज्येष्ठांच्या स्पर्धा गाजवणारे धावपटू आर. बी. भवार, चित्रकार पिसुर्वो व साहित्यशास्त्री तेजपाल चौधरींसह ८४ दीपस्तंभांचा धांडोळा घेण्यात आला आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.












