Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले ; वाचा सविस्तर

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 14, 2026
in india - world
0
रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले ; वाचा सविस्तर
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका ! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले ; वाचा सविस्तर

मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष ब्लॉकेडमुळे उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे आणि परतीच्या प्रवासात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. कसारा ते आसनगाव दरम्यान सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे जळगावसह खान्देशातून धावणाऱ्या गरीब रथ आणि सेवाग्रामसह तब्बल ५ महत्त्वाच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, आज आणि उद्या या गाड्या जळगाव स्टेशनवर येणार नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

कसारा ते आसनगावदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि यार्ड + विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकचा थेट फटका उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. ५ महत्त्वाच्या गाड्या मार्ग बदलून धावणार आहे. यानुसार १४ आणि १५ ऑक्टोबरला सेवाग्राम व गरीब रथ कल्याणमार्गे वळवल्याने या दोन्ही गाड्या जळगावला येणार नसल्याचे रेल्वेने कळवले आहे. नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोऱ्याच्या प्रवाशांना याचा फटका बसणार आअशा

वळवलेल्या गाड्या अशा

गाडी क्र. १२१३९ सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १४ आणि १५ ऑक्टोबरला पुणे-मनमाडमार्गे वळवली आहे. क्र. १२१८८ सीएसएमटी – जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस १५ ऑक्टोबर रोजी पुणे-मनमाड मार्गे धावेल. १४ ऑक्टोबर रोजी गाडी क्र. १२५९८ सीएसएमटी – गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस पुणे मार्गे वळवली आहे. ११०४३ दादर -बलिया एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी पुणे-मनमाडमार्गे जाईल. ११०४७ दादर – गोरखपूर एक्स्प्रेस ही १५ ऑक्टोबर रोजी पुणेमार्गे वळवली आहे.

आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेचे हे काम, कसारा आणि कल्याण दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचाच एक भाग आहे. यामुळे मेल/एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे सेवांची वाहतूक स्वतंत्र करणे शक्य होईल आणि मार्गिकेची क्षमता भविष्यात वाढवण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण होईल. तसेच, यामुळे कामकाजातील लवचिकता वाढेल, गाड्यांच्या हालचालींचे नियमन अधिक सुलभ होईल आणि अतिरिक्त गाड्यांची सेवा हाताळण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.

ब्लॉकच्या तारखा:

दिनांक १४.१०.२०२६ (बुधवार) ते दिनांक १६.१०.२०२६ (शुक्रवार)

दिनांक १४.१०.२०२६ (बुधवार) रोजी १५.३५ ते २०.३५ वाजेपर्यंत,

दिनांक १५.१०.२०२६ (गुरुवार) रोजी १५.३५ ते १९.३५ वाजेपर्यंत,

दिनांक १६.१०.२०२६ (गुरुवार-शुक्रवार मध्यरात्र) रोजी ०३.०० ते ०६.०० वाजेपर्यंत आणि

दिनांक १६.१०.२०२६ (शुक्रवार) रोजी १५.३५ ते १९.३५ वाजेपर्यंत.

१४.१०.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11081 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपुर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.३५ ऐवजी १७.५० वाजता सुटेल,

दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12107 लोकमान्य टिळक टर्मिनस – सीतापुर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.२५ ऐवजी १७.३५ वाजता सुटेल,

दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 13380 लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.५५ ऐवजी १८.०५ वाजता सुटेल.

कल्याण – कर्जत – पुणे – मनमाड मार्गे वळवण्यात येणाऱ्या गाड्या

गाडी क्रमांक 12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपुर अंत्योदय एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६)

गाडी क्रमांक 11043 दादर – बलिया एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६)

गाडी क्रमांक 12188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जबलपुर गरीब रथ एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.१०.२०२६)

गाडी क्रमांक 11047 दादर – गोरखपुर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.१०.२०२६)

गाडी क्रमांक 12139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६).

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

HTML img Tag Simply Easy Learning

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

आजचे राशिभविष्य, १४ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Next Post

जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर ?

Next Post
जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर ?

जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697