Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

चाळीस वर्षांची मौन साधना असलेले कालिदास महाराजांचे भीषण अपघातात निधन

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 18, 2026
in maharashtra
0
चाळीस वर्षांची मौन साधना असलेले कालिदास महाराजांचे भीषण अपघातात निधन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

HTML img Tag Simply Easy Learning

परभणी (प्रतिनिधी) : – मराठवाड्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आहे. गेल्या चार दशकांपासून शब्दांशिवाय केवळ आपल्या अस्तित्वाने लाखो भाविकांच्या जीवनाला सन्मार्ग दाखवणारे, दत्त सांप्रदायाचे कालिदास महाराज यांचे आज बीड बायपास परिसरात झालेल्या रस्ते अपघातात निधन झाले.

HTML img Tag Simply Easy Learning

या दुर्दैवी अपघातात महाराजांसह त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात आणि आध्यात्मिक विश्वास तीव्र शोककळा पसरली आहे.

दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंजचे कालिदास महाराज हे वासुदेवानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुजरात येथील श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून दर्शन आटपून आपल्या सहकाऱ्यांसह ते वाहनाने गुंजकडे परत येत होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांनी घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सावत्र आईचा त्रास अन् ४० वर्षांपूर्वी सुरू झालेले मौनव्रत

कालिदास महाराज यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील बोरी हे होते. बालपणी त्यांना सावत्र आईकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला, ज्यामुळे त्यांनी आपले घर सोडले. घर सोडल्यानंतर ते गुंज येथील चिंतामणी महाराज यांच्या आश्रयाला आले. त्यांनी आपली सर्व व्यथा चिंतामणी महाराजांसमोर मांडली. तेव्हा चिंतामणी महाराजांनी त्यांना एक मोलाचा उपदेश केला, तू आता कोणाशीही बोलू नकोस, फक्त माझ्याशी बोल. गुरुंचा हा शब्द प्रमाण मानून कालिदास महाराजांनी अखंड मौनव्रत धारण केले, जे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिले.

भक्तांशी डायरीतून संवाद साधून करायचे समाजप्रबोधन

गेल्या ४० वर्षांपासून एकाही शब्दाचा उच्चार न करता महाराजांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला. त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारो भक्त येत असत. महाराज सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचे, पण स्वतः मात्र तोंडातून एक शब्दही काढत नसत. त्यांना भक्तांना जे काही सांगायचे असायचे, ते ते एका डायरीमध्ये लिहून दाखवायचे. या आगळ्या-वेगळ्या संवाद पद्धतीतून आणि आपल्या डोळ्यांतील करूणेने त्यांनी हजारो लोकांना व्यसनमुक्ती, सदाचार आणि लोककल्याणाचा मार्ग दाखवला.

गुंज नगरी शोकाकुल

कालिदास महाराजांच्या अपघाती निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला. समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेची शिकवण देणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे बोर्डीकर म्हणाल्या.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक

Next Post

शाळेच्या संचालकाच्या बायकोचे ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध; बेडवर विषारी साप सोडून खून

Next Post
शाळेच्या संचालकाच्या बायकोचे ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध; बेडवर विषारी साप सोडून खून

शाळेच्या संचालकाच्या बायकोचे ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध; बेडवर विषारी साप सोडून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697