राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीं घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बुधवारी दिल्लीत बैठक झाली.
या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्रिमंडाळात फेरबदलाच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अर्थ खात्यासह राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात खांदेपालट करून अकार्यक्षम मंत्र्यांना डिच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. त्यासाठी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक झाली. नेमकी चर्चा काय झाली हे समोर आले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलासह कोणत्या घडामोडी आगामी काळात होतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने बदलाच्या चर्चेला जोर
दिल्लीत झालेल्या बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकसाथ दिल्लीमध्ये अमित शाह यांना भेटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठी घडामोड होण्याची शक्यता मनाली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळण्यासह पक्षातील काही मंत्रिपदं बदलण्याची गरज राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी गृहमंत्री अमित शहांकडे व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संघटनात्मक बळकटीवर भर
बैठकीची माहिती जशी समोर आली नसली, तरी या भेटीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असतांना पक्षात मरगळ दिसत असल्याने पक्ष नेतृत्व नाराज आहे. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर ज्या पद्धतीने कामे करण्याची गरज होती, ती होतांना दिसत नाही पक्षाचा विस्तार खुंटला आहे. पक्षासाठी नजरेत भरेल, असे कोणतेच काम दिसत नसल्याने पक्ष प्रमुख सुनेत्रा पवार या नाराज होत्या. त्यामुळे पक्षाला अंतर्गत बळकटी देण्यासाठी काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्याच अनुषंगाने अमित शहा यांच्याशी अंतर्गत फेरबलाची चर्चा केल्याचे समजते.
राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असल्याने राष्ट्रवादीत अंतर्गत बदलाचे संकेत मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खा. पार्थ पवार देखील उपस्थित असल्याने आगामी काळात राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या भेटनानंतर महराष्ट्राच्या राजकारणात कोणती मोठी घडामोड घडते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










