जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

शहरातील पिंप्राळा परिसराकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी बी. यू. एन. रायसोनी शाळेजवळ उड्डाणपूल (बोगदा) आहे. सोमवार, २३ नोव्हेंबरपासून काही दिवसांसाठी वाहतूकीसाठी हा बोगदा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पायाभरणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने जळगाव शहर महानगरपालिकेने हा बोगदा बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
शहरातील रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासोबतच महामार्गावरील वाहतूकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (MRIDC) यांच्यामार्फत बी. यू. एन. रायसोनी शाळेजवळील परिसरात या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामांतर्गत आता पायाभरणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बांधकामाच्या ठिकाणी नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ सुरू राहिल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित बोगदा वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बोगदा बंद झाल्यानंतर पिंप्राळा भागात जाणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे. त्यानुसार वाहनधारकांनी बी. यू. एन. रायसोनी शाळेजवळून उजव्या बाजूला वळण घ्यावे. त्यानंतर नवजीवनसमोरील महामार्ग ओलांडून युंदाई शोरूमसमोरून बेंडाले नगर मार्ग पिंप्राळा परिसरात पोहोचता येणार आहे. या पर्यायी मार्गाचा वापर केल्यास बोगदा बंद असतानाही पिंप्राळा परिसरातील दैनंदिन वाहतूक सुरू ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी जुन्या मार्गाचा आग्रह न धरता पर्यायी मार्गानेच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा असेल पर्यायी मार्ग
बीयूएन रायसोनी शाळेजवळून नवजीवन समोरुन महामार्ग ओलांडून होंडाई शोरुम मार्गे बेंडाळे नगरमधून पिंप्राळा.तर पिंप्राळा वासियांना भवानी माता मंदिराकडून मानराज पार्कमार्गे महामार्ग ओलांडून किंवा गुजराल पेट्रोल पंपमार्गे महामार्गावरुन प्रवास करता येईल. या परिसरात लहान मुलांची रायसोनी शाळा असल्याकारणाने फुल सुधारणा कालावधीत वाहनधारकांनी लहान मुलांचा विचार करून अतिशय संथ गतीने आपले वाहने चालवावेत असे आवाहन दैनिक मार्केट स्पेशल तर्फे शहर वास यांना करण्यात येत आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











