Monday, November 23, 2026
Dainik Market Special
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
November 23, 2026
in jalgaon
0
हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या

डिंकाचे लाडू, तूप, सुका मेवा आणि च्यवनप्राश सेवन करताना प्रमाण महत्त्वाचे; स्थूलता, मधुमेह, हृदय विकार आणि फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी – आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला

हिवाळा सुरू होताच घराघरांत डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, सुका मेवा, तूप, गूळ आणि च्यवनप्राश यांचे सेवन वाढते. थंडीच्या दिवसांत शरीराला अधिक ऊर्जा आणि पोषण मिळावे, या पारंपरिक विचारातून या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. मात्र, बदललेल्या जीवनशैलीत हे पदार्थ प्रत्येकासाठी आणि प्रत्येक प्रमाणात योग्य आहेत का, याचा विचार करणे आवश्यक आहे.

आयुर्वेदातील ऋतुचर्येनुसार हिवाळ्यात वातावरणातील शीत आणि रुक्ष गुणधर्मांमुळे वातदोषावर परिणाम होतो. विशेषतः हेमंत ऋतूमध्ये जठराग्नी अर्थात पचनशक्ती बलवान होत असल्याचे आयुर्वेदात वर्णन आहे. त्यामुळे या काळात शरीराला पोषक, स्निग्ध आणि ऊर्जादायी आहार सुचविला जातो. मात्र, व्यक्तीची प्रकृती, पचनशक्ती, वय आणि शारीरिक हालचाली यांचा विचार करूनच आहार ठरविणे आवश्यक आहे.

मात्र, आजच्या काळात जीवनशैलीमध्ये मोठे बदल झाले आहेत. दिवसभर बसून काम करणे, व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचाली कमी असणे यामुळे स्थूलता आणि चयापचयाशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. अशा व्यक्तींनी केवळ हिवाळा आहे म्हणून अतिरिक्त तूप, गूळ, साखर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू खाणे टाळावे.

विशेषतः स्थूलता, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी आहाराचे प्रमाण आणि स्वरूप याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. च्यवनप्राशसारखे पारंपरिक आयुर्वेदिक रसायन घेतानाही त्यातील साखरेचे प्रमाण आणि स्वतःची आरोग्यस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यात नेमका आहार कसा असावा?

हिवाळ्यात बाजरी, ज्वारी, नाचणी यांसारख्या धान्यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा. ऋतूनुसार उपलब्ध ताज्या भाज्या, फळे, मूग, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थ नियमित खावेत. आले, लसूण, काळी मिरी, दालचिनी आणि वेलची यांसारख्या मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

भाज्या आणि डाळींपासून तयार केलेले गरम सूप आहारात समाविष्ट करावे. शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. सुका मेवा आणि तूप यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. गोड पदार्थ आणि अतिप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन कमी ठेवावे.

हिवाळा म्हणजे व्यायाम आणि योग्य आहाराची संधी-

हिवाळ्यात शरीराला सक्रिय ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे तितकेच महत्त्वाचे आहे. चालणे, सूर्यनमस्कार, योगासने आणि क्षमतेनुसार व्यायाम केल्याने आरोग्यास दीर्घकालीन फायदा होतो. योग्य आहारासोबत नियमित शारीरिक हालचालींचा समतोल राखणे आवश्यक आहे.

“डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, सुका मेवा, तूप आणि गुळाचे पदार्थ पौष्टिक असले तरी त्यांमध्ये कॅलरीज आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण अधिक असते. नियमित व्यायाम करणाऱ्या, शारीरिक श्रम घेणाऱ्या आणि चांगली पचनशक्ती असलेल्या व्यक्तींनी हे पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.”

“आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या पारंपरिक आहाराचे महत्त्व जपत आजच्या बदललेल्या जीवनशैलीनुसार त्यात योग्य बदल करणे ही काळाची गरज आहे,” असा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. जितेश पाठक ( प्राणदा आयुर्वेद) धुळे यांनी दिला आहे.

 

HTML img Tag Simply Easy Learning

– डॉ. जितेश पाठक  प्राणदा आयुर्वेद, धुळे

HTML img Tag Simply Easy Learning

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

आजचे राशीभविष्य

दैनिक मार्केट स्पेशल

दैनिक मार्केट स्पेशल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या

by दैनिक मार्केट स्पेशल
November 23, 2026
0

हेमंत ऋतूमध्ये पौष्टिक आहाराच्या नावाखाली अतिखाणे टाळा ! पचनशक्ती आणि जीवनशैलीनुसार आहार घ्या डिंकाचे लाडू, तूप, सुका मेवा आणि च्यवनप्राश...

सोमवार ठरणार भाग्याचा टर्निंग पॉइंट; काही राशींच्या पदरात यश, तर काहींसमोर नात्यांची परीक्षा

आजचे राशीभविष्य

by दैनिक मार्केट स्पेशल
November 23, 2026
0

मेष आणि तूळ राशीसह अनेक राशींना आज ग्रहांच्या शुभ गोचराचा लाभ ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य   मेष ते मीन...

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

समजाविण्याचा कोणी प्रयत्न करू नका, तेवढी अक्कल आम्हाला आहे, सेनेच्या आमदाराने मंत्री गुलाबरावांनाच सुनावले जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ...

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू ! राजस्थानमध्ये तीर्थयात्रेवर गेलेल्या धुळ्यातील एका कुटुंबावर...

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

राग अनावर, टीका जिव्हारी, कोणत्या कारणामुळे धुळ्याच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल ?   धुळे शहराच्या राजकारणात वैयक्तिक टीकेचा वाद आता...

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण   रक्ताच्या जवळच्या नातेसंबंधांमधील विवाहामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक...

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

चीनच्या मार्केटमध्ये तांडव, एका झटक्यात 158,00,00,00,00,00,000 बुडाले; दणक्या मागे अमेरिकेचा हात, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले  बिजिंग : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात...

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन ; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव !

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे दैनिक मार्केट स्पेशलकडून अभिष्टचिंतन; जळगावच्या विकासातील योगदानाचा गौरव! जळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा...

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

जळगावकरांनो लक्ष द्या ! पिंप्राळा रेल्वे पुलाखालील वाहतूक उद्यापासून होणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग   शहरातील पिंप्राळा परिसराकडे जाणाऱ्या...

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!

by दैनिक मार्केट स्पेशल
November 22, 2026
0

खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न! अमिताभ बच्चन सूत्रसंचालन...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697