Sunday, August 30, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

अटकेच्या भीतीने जळगावातील काही शिक्षण संस्थाचालक भूमिगत……

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 29, 2026
in jalgaon
0
अटकेच्या भीतीने जळगावातील काही शिक्षण संस्थाचालक भूमिगत……
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अटकेच्या भीतीने जळगावातील काही शिक्षण संस्थाचालक भूमिगत असल्याची चर्चा ; शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास वेगात

HTML img Tag Simply Easy Learning

जळगाव : शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, अटकेच्या भीतीने जळगाव जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थाचालक संपर्काबाहेर गेल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. नाशिकच्या विशेष तपास पथकाने जामनेर तालुक्यातील दी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे चालक संजय भास्करराव गरुड (वय ६७) यांना सोलापूर येथून अटक केल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपास यंत्रणेनुसार, शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान जळगावसह विविध जिल्ह्यांतील २०० हून अधिक माध्यमिक शाळांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत १,२०० संशयितांची ओळख पटली असून, पाच प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने संजय गरुड यांना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

अटकेच्या भीतीने सुरक्षित ठिकाणांचा शोध?
संजय गरुड यांच्या अटकेनंतर तपासाची साखळी आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही शिक्षण संस्थाचालकांनी अटकेची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याचीही चर्चा असून, त्यासाठी नामांकित विधिज्ञांची मदत घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक झाल्यानंतर संबंधितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आता संजय गरुड यांच्या अटकेनंतर अनेकांनी संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


१७७ बनावट शालार्थ आयडींचा संशय
विशेष तपास पथकाच्या प्राथमिक तपासानुसार, संजय गरुड यांनी त्यांच्या संस्थेअंतर्गत विविध शाळांमधील शिक्षक भरतीसाठी अवघ्या एका दिवसात १७७ बनावट शालार्थ आयडी तयार करून घेतल्याचा संशय आहे. या प्रक्रियेत देणगीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची चौकशी सुरू असून, तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत आहे.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांनी या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसल्याचे त्यांना सांगितल्याचा दावा केला आहे. मात्र, तपास यंत्रणा उपलब्ध पुरावे आणि नोंदींच्या आधारे पुढील कारवाई करत असल्याचे समोर आले आहे.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही तपासाच्या कक्षेत समावेश
या प्रकरणात केवळ संस्था चालकच नव्हे, तर शिक्षण विभागातील काही अधिकारी तसेच वेतन पथकातील कर्मचाऱ्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील काही संशयित तपास यंत्रणांच्या रडारवर असून, त्यांपैकी काही जण भूमिगत झाल्याची चर्चा आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्‍या आरक्षणासाठी वार्षिक ८ लाखांची उत्पन्न मर्यादा प्रथमदर्शनी योग्यच’

Next Post

जळगावमध्ये 2 हजार महिलांनी नाकारली ‘लाडकी बहीण’ योजना; महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज

Next Post
जळगावमध्ये 2 हजार महिलांनी नाकारली ‘लाडकी बहीण’ योजना; महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज

जळगावमध्ये 2 हजार महिलांनी नाकारली 'लाडकी बहीण' योजना; महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजीच्या जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

 

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 29 ऑगस्ट 2026 च्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील 29 ऑगस्ट 2026 च्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. मंगला एक्स्प्रेसमध्ये 35 विद्यार्थ्यांना विषबाधेसदृश त्रास; भुसावळहून वैद्यकीय यंत्रणा सक्रिय...

सिप्ला कंपनीला मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; एफडीएची कठोर कारवाई

सिप्ला कंपनीला मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; एफडीएची कठोर कारवाई

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

सिप्ला कंपनीला मोठा दणका! औषध विक्रीचा परवाना रद्द; एफडीएची कठोर कारवाई पुणे : प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी सिप्ला फार्मा अँड...

भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत खडसेंचे मोठे योगदान; चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट

भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत खडसेंचे मोठे योगदान; चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत खडसेंचे मोठे योगदान; चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट अमृत महोत्सवानिमित्त खडसेंना दिल्या शुभेच्छा; म्हणाले, “एकनाथ खडसे...

नेपाळचा मोठा निर्णय! भारतीय रेस्क्यू टीमला नकार ; मृतांचा आकडा 469 वर

नेपाळचा मोठा निर्णय! भारतीय रेस्क्यू टीमला नकार ; मृतांचा आकडा 469 वर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 29, 2026
0

नेपाळचा मोठा निर्णय! परदेशी रेस्क्यू टीमला नकार; भारत-चीनसह अनेक देशांची मदत नाकारली, मृतांचा आकडा 469 वर काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवरील...

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

नेपाळ महापुरात कैलास-मानसरोवर यात्रेकरूंचा समूह बेपत्ता; मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांचाही समावेश ३० वर्षांहून अधिक काळ हिमालयाची भ्रमंती;...

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

भाजप नेत्याच्या सुनेचा घरात संशयास्पद मृत्यू; पतीच्या कथित अनैतिक संबंधांचा आरोप, अंतर्वस्त्रात सापडली सुसाईड नोट सूरत : भाजपशी संबंधित स्थानिक...

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?

by दैनिक मार्केट स्पेशल
August 28, 2026
0

चंद्रग्रहण, भद्राची सावली अन् राहुकाळ! 28 ऑगस्टला रक्षाबंधन; राखी बांधण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता? जळगाव : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट...

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697