धक्कादायक : भाजप आमदाराने लेकीचं धडाक्यात लग्न लावलं, पण काही महिन्यांत बसला हादरा; जावयाची तब्बल 25 लग्न, मुंबईत उद्योग असल्याचा बनाव
एखाद्या चित्रपटाला शोभेल, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदाराने आपल्या लेकीचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं. जावई उद्योजक असल्याने आमदारही आनंदात होते.
पण काही महिन्यांत बाप-लेकीला हादरा बसला. जावयाने बनावट ओळखींचा वापर करून लेकीसह आपल्यालाही गंडा घातल्याचे आमदारांना समजले. जावयाने अशाचप्रकारे तब्बल २५ मुलींना फसवून लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही, जावयाचे वडीलही या कृत्यात सहभागी होते.
उत्तर प्रदेशातील सेवता येथील भाजपचे आमदार ज्ञान तिवारी आणि त्यांच्या लेकीची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी जावई प्रखर त्रिवेदी आणि त्याचे वडील अनुज त्रिवेदी यांना अटक करण्यात आली आहे. आमदारांच्या तक्रारीवरून नुकताच दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार, तिवारी यांची लेक प्रज्ञा हिचा प्रखर यांच्यासोबत २०२४ मधये विवाह झाला होता.
लग्न ठरवत असताना अनुज त्रिवेदी याने आपला महाराष्ट्र, मुंबईत रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. त्याआधारे तिवारी यांनी त्रिवेदी कुटुंबाची चौकशीही केली. ओळखीतील काही व्यक्तींकडे विचारपूस केल्यानंतरच लग्न ठरविण्यात आले होते. काही महिने लोटल्यानंतर सोशल मिडिया आणि अन्य माध्यमातून प्रखर त्रिवेदी याच्या काळ्या कारनाम्यांची माहिती मिळाल्याचे तिवारी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
प्रखर त्रिवेदी याने महाराष्ट्रासह विविध राज्यांतील २५ महिलांची फसवणूक करून त्यांच्याशी विवाह केल्याचा आरोप ज्ञान तिवारी यांनी केला आहे. बाप-लेकाने आपली बनावट ओळखींच्या आधारे लाखो रुपये उकळल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याशी सर्व संबंध तोडून आपण लेकीला घरी आणल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे. त्यांनी ६ ऑगस्ट रोजी सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करत आपली व्यथा जगासमोर मांडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अनुज आणि प्रखर त्रिवेदी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ दरम्यान, या घटनेमुळे आपल्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक प्रतिष्ठेलाही धक्का बसल्याचे तिवारी यांनी सांगितले. त्यांनी आरोपांनी कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










