कांदा लसूण न घालता बनवलेली सात्विक डाळ/वरण
रेसीपी: विदर्भकन्या सोनलगांवकर, मडगाव (गोवा)
1) एक छोटी वाटी तुरडाळ, अर्धी वाटी मूगडाळ स्वच्छ धुवून घ्यायची.
2) धुतलेली डाळ कुकरमध्ये घेऊन त्यात दोन हिरव्या मिरच्यांचे उभे काप व एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा.
3) कुकरमध्ये पाणी घालून त्यात थोडी हळद व तेल घालुन कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या.
4) कुकर थंड झाल्यावर, कुकरचं झाकण उघडून डाळ घोटून त्यात आपल्याला डाळ जेवढी पातळ हवी तेवढं पाणी घालून डाळीत मीठ घालून डाळ गॅसवर उकळायला ठेवायची.
5) डाळीसाठी मस्त एक खमंग फोडणी करायची. तेल गरम करून त्यात हिंग, जिरे, मोहरी घालायचे.
6) मोहरी आणि जिरे तडतडल्यावर त्यात अगदी थोडेसे तिखट टाकून ही चरचरीत फोडणी डाळीवर घालायची व कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा.झाली आपली चविष्ट सात्विक डाळ तयार!
सौजन्य- विदर्भकन्या: सोनलगांवकर, मडगाव, गोवा
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










