Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
August 24, 2026
in maharashtra
0
ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. मराठी भाषा, तिचे व्याकरण आणि प्रमाणलेखन यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य करणाऱ्या यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा आणि साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बाणेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

‘बोली भाषा कोणतीही असो; मात्र लिखाण करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे,’ अशी ठाम भूमिका त्यांनी आयुष्यभर मांडली. मराठी भाषेच्या शुद्धतेसह तिच्या संवर्धनासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती केली.

HTML img Tag Simply Easy Learning

ज्यू कुटुंबात जन्म; विवाहानंतर यास्मिन शेख

यास्मिन शेख यांचा जन्म ज्यू कुटुंबात झाला होता. त्यांचे मूळ नाव जेरुषा रुबेन असे होते. १९५० मध्ये त्यांचा अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी ‘यास्मिन शेख’ हे नाव स्वीकारले. मात्र त्यांनी आपला धर्म बदलला नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते..त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.

३४ वर्षे अध्यापन; सहा वर्षे विभागप्रमुख

प्रा. यास्मिन शेख या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी होत्या. शाळा आणि महाविद्यालयात त्यांनी तब्बल ३४ वर्षे अध्यापन केले. मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात सहा वर्षे त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.

भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. राज्य शासनाच्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरमध्ये त्यांनी आयएएसच्या विद्यार्थ्यांना तब्बल दहा वर्षे व्याकरण आणि भाषाशास्त्राचे अध्यापन केले.

‘भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे,’ हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने रुजवला.

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान

बालभारतीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे त्यांनी इतर तज्ज्ञांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रकाशित ‘कार्यात्मक व्याकरण’ या पुस्तकाच्या निर्मितीतही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने त्यांना डॉ. अशोक केळकर सन्मान प्रदान करण्यात आला होता.

‘आपणच आपली भाषा प्रदूषित करीत आहोत’

मराठी भाषेच्या वापराबाबत त्या अत्यंत आग्रही होत्या. दैनंदिन संभाषणात मराठी माणसे सहजपणे परकीय शब्दांचा वापर करतात. या प्रवृत्तीमुळे मराठी भाषेचे स्वरूप दूषित होत असल्याची खंत त्या व्यक्त करीत.

बोली भाषा कोणतीही असली तरी लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने आग्रह धरला. मराठी भाषेची शुद्धता, समृद्धी आणि जतन यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

यशस्वी जैस्वालवर ICCची कारवाई; मैदानावरील वाद पडला महागात, सामना शुल्काच्या २५% दंडासह डिमेरिट पॉइंट

Next Post

”मी आता जास्त काम करु शकत नाही…”, नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, नेमकं काय म्हणाले?

Next Post
”मी आता जास्त काम करु शकत नाही…”, नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, नेमकं काय म्हणाले?

''मी आता जास्त काम करु शकत नाही...'', नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, नेमकं काय म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697