पुण्यात बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त ठरला ! मानाचे 5 गणपती ‘या’ वेळी विराजमान होणार
गणेशोत्सवासाठी अवघी पुणेनगरी सज्ज झाली असून, घरगुती श्रींसोबतच सार्वजनिक मंडळांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मानाचे पाच गणपती आणि शहरांतील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी आपली परंपरा जपत यंदाही भव्य देखावे उभारले आहेत.
या मानाच्या पथकांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
मानाच्या 5 गणपतींची माहिती:
1.कसबा गणपती (मानाचा पहिला): उत्सव मंडपातच श्रींची स्थापना होणार असून वेदमूर्ती देवव्रत रेखे गुरुजींच्या हस्ते दुपारी 11:45 वाजता प्राणप्रतिष्ठा होईल. प्रभात बँड, शौर्य, संघर्ष आणि ज्ञानप्रबोधिनी पथकांचे वादन हे मुख्य आकर्षण असणार आहे.

2. तांबडी जोगेश्वरी (मानाचा दुसरा): मंडळ 134 व्या वर्षात पदार्पण करत आहे. बाप्पा चांदीच्या पालखीत विराजमान होणार असून आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते दुपारी 12:15 वाजता प्राणप्रतिष्ठा होईल. मिरवणुकीत न्यू गंधर्व ब्रास बँड, ताल ढोल-ताशा आणि नगारा वादन असणार आहे.
3 गुरुजी तालीम (मानाचा तिसरा): जगन्नाथ मंदिराची सुरेख प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दुपारी 1:50 वाजता प्राणप्रतिष्ठा होणार असून ढोल-ताशांच्या गजरात आगमन मिरवणूक निघेल.
4. तुळशीबाग गणपती (मानाचा चौथा): ब्रह्मणस्पती मंदिराचा देखावा उभारला आहे. दुपारी 12:30 वाजता श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल.
5. केसरीवाडा गणपती (मानाचा पाचवा): पारंपरिक रीतीने ऐतिहासिक केसरीवाड्यात दुपारी 11:45 वाजता रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. बिडवे बंधूंचे सनई-चौघडे आणि श्रीरंभकलावंत पथक मिरवणुकीत सहभागी होईल.
इतर प्रमुख मंडळे:
1. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती: वृंदावनच्या ‘प्रेम मंदिर’ देखाव्यात बाप्पा विराजमान होणार आहेत. दुपारी 18 वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल. मयूर रथातून निघणाऱ्या मिरवणुकीत गंधाक्ष पथक आणि विविध बँड रंग भरतील.
2.अखिल मंडई मंडळ: ‘हरिहर मंदिर’ देखाव्यात दुपारी 12:00 वाजता डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल.हुतात्मा बाबू गेनू मंडळ: ‘सोरटी सोमनाथ मंदिर’ देखाव्यात सकाळी 11:30 वाजता अभिनेते निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकते यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











