जळगाव (प्रतिनिधी)— सहा दिवसांपूर्वीच लग्न होऊन माहेरी जात असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे वैशाली भाऊसाहेब पाटील या नवविवाहितेचा मृत्यू झाला.

सहा दिवसांपूर्वीच लग्न होऊन माहेरी जात असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे वैशाली भाऊसाहेब पाटील (२१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) या नवविवाहितेचा मृत्यू झाला. तर तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील (४०, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) हे जखमी झाले.
अपघात सोमवारी (१३ जुलै) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास महामार्गावर विद्यापीठासमोर झाला. नववधूच्या हातावरील मेहंदी पुसण्यापूर्वीच तिच्यावर काळाने झडप घातल्याने माहेरी व सासरी असलेला लग्नाचा आनंद क्षणात हरवला.
अमळनेर तालुक्यातील कोळपिंप्री येथील वैशाली पाटील या तरुणीचे जळगावातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील देवरामनगरातील रहिवासी, पोलीस कर्मचारी विजय पाटील यांच्याशी ७ जुलै रोजीच लग्न झालं.
घरून काही अंतरावर पोहोचताच अपघात

नववधू व तिचे काका दुचाकीने गावी परतत असताना ते घरापासून काही अंतरावर विद्यापीठासमोर पोहोचले, त्यावेळी समोरून भरधाव वेगाने अन्य वाहनाला ओव्हरटेक करीत येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात नववधूच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला.
अपघातात नववधूचे काका प्रवीण पाटील यांचा पाय फॅक्चर होण्यासह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन्ही कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर
अपघाताची माहिती मिळताच सासरचे व माहेरचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. सहा दिवसांपूर्वीच लग्न झाले व नियतीने पत्नीला हिरावल्याने पती विजय पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यासह दोन्ही कुटुंबीयांनी आक्रोश केला.

लग्नानंतर नवदाम्पत्य दोन दिवसांपूर्वीच देवदर्शनाहून परतले आणि सोमवारी नवविवाहिता माहेरी जाणार होती. त्यासाठी तिचे काका प्रवीण पाटील हे तिला घेण्यासाठी आले होते. दुपारी दोघेही दुचाकीने कोळपिंप्री येथे जाण्यासाठी निघाले.
धडक देणारी कार ताब्यात
अपघातानंतर पाळथी दूरक्षेत्र पोलीस घटनास्थळी पोहोचले व दुचाकीला धडक देणारी कार ताब्यात घेतली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











