अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट
25 सप्टेंबर रोजी देशभरात अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन असल्याने बँका सुरू असणार की बंद, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर बँकांच्या शाखा सुरू असतील की बंद, याबाबत RBI ने आपल्या कॅलेंडरमध्ये माहिती दिली आहे
बँका सुरू
RBI च्या कॅलेंडरनुसार, 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बँका नेहमीप्रमाणे सुरू असणार आहेत. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील बँकांच्या शाखा त्यांच्या नियोजित वेळेनुसार सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांना बँकेत जाऊन प्रत्यक्ष (फिजिकल) व्यवहार करता येणार आहेत.
शनिवारी सुट्टी, रविवारी सुरू
शुक्रवारनंतर 26 सप्टेंबर रोजी शनिवार असल्याने बँकांना चौथ्या शनिवारची सुट्टी असेल. मात्र, रविवारी साप्ताहिक सुट्टी असतानाही सरकारच्या निर्णयानुसार देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुरू राहतील. याबाबत वित्त मंत्रालयाने माहिती दिली आहे.
सलग 3 दिवस संप
28, 29 आणि 30 सप्टेंबर हे महिन्याचे शेवटचे तीन दिवस असून, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा संपावर जाणार आहेत. त्यामुळे या काळात बँकांच्या शाखा बंद राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी बँकिंग सेवा दीर्घकाळ बंद राहू नयेत, यासाठी रविवार, 27 सप्टेंबर रोजी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ऑनलाइन सेवा सुरू
संपामुळे आणि सुट्ट्यांमुळे बँकेच्या शाखा बंद असल्या तरी या काळात डिजिटल बँकिंग सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध राहतील. ग्राहक UPI, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे आणि ऑनलाइन व्यवहार करणे सुरू ठेवू शकतात.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











