Thursday, August 27, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

श्री क्षेत्र अमरापूर

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
July 15, 2026
in maharashtra
0
श्री क्षेत्र अमरापूर
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री क्षेत्र अमरापूर 

HTML img Tag Simply Easy Learning

स्थान: श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे समोरचे कृष्णा तीरावर.
सत्पुरूष: भगवान श्री.नृसिंहसरस्वती, श्री. दीक्षित स्वामी महाराज, श्री. दत्तमहाराज कविश्वर.
विशेष: श्री गुरुचरित्रातील ६४ योगिनी मंदिर, गुरुपादुका, घेवडा वेल प्रसंगाचे स्थान.

HTML img Tag Simply Easy Learning

अमरापूर क्षेत्र पुण्यपावन कृष्णा नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. हे स्थान चौसष्ठ योगीनींचे निवासस्थान असलेल्या शक्ती तीर्थाजवळ आहे. श्रीगुरुंची सेवा त्या अदृश्य रूपाने करीत असत. अमरेश्वरजवळच पापविनाशी तीर्थ व इतर तीर्थे आहेत. नृसिंहसरस्वती यांनी १२ वर्षे येथे वास केला.

श्री नृसिंहसरस्वतींच्या वास्तव्याने पुनित झालेले ग्राम पुढे नृसिंहवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले.

अमरापूर हे नृसिंहवाडीपासून फक्त १ कि.मी अंतरावर आहे. श्रीगुरुंच्या काळात हे दोन्हीही एकच असावे. नृसिंहवाडीपासून अमरेश्र्वर मंदिर दिसते. श्रीगुरूचरित्रात १८ व्या अध्यायात श्रीगुरुचे पंचगंगा व कृष्णेच्या संगमस्थानी आल्याचा उल्लेख आढळतो. श्रीगुरुंची दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेल्याचा व घेवड्याच्या शेंगांचा वेल उपटून त्याचे दरिद्र हरण केल्याचा उल्लेख आहे. ही जागा अमरेश्वर मंदिराजवळच आहे. या अध्यायाचे रोजचे वाचन दरिद्र हरण्यासाठी एक हमखास सिद्ध उपाय आहे.

श्रीगुरुचरित्रात १९ व्या अध्यायात ६४ योगिनी नृसिंहसरस्वतींना पाण्याखाली असलेल्या त्यांच्या स्थानी नेऊन त्यांची पूजा अर्चा व आरती करुन विशेष पूजा माध्यान्ही करत असत. याचठिकाणी गंगानुजावर, श्रीगुरुंनी कृपा केली. त्यास त्रिस्थळी यात्रा घडवली.

श्रीगुरुंनी नंतर आपण गाणगापूरी जाण्याचा निश्चय चौसष्ट योगीनींना व भक्तास सांगितले त्यांना अतिशय दु:ख झाले.

६४ योगिनी श्रीगुरुंची पुजा करतांना श्रीगुरुंनी त्यांना सांगितले, मी अदृष्य रुपात येथेच वास करुन भक्तांची मनोरथे पूर्ण करणार आहे. याठिकाणी मनोहर पादूकांचा वास असेल, अन्नपूर्णा असेल. अमरेश्र्वर येथे चौसष्ट योगिनींचे मंदीर आहे. तेथे पादूका आहेत. तेथील झरोक्यातून पाहिल्यास नृसिंहवाडीचे मंदीर दिसते. या क्षेत्राच्या जीर्णोद्धाराचे कार्य प. पू. दत्तमहाराज कविश्र्वर यांनी केले आहे.

अमरापूर म्हणजे ग्राम । स्थान असे अनुपम्य ।
जैसा प्रयाग संगम । तैसे स्थान मनोहर ॥
वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरू ॥
देव असे अमरेश्वर । तया संगमा षटकूळी ॥ (गुरुचरित्र अध्याय १८)

श्री अमरेश्वरांचे हे स्थान फार युगांपूर्वीचे आहे. इ. स. १४ व्या शतकामध्ये “श्री नृसिंहसरस्वती महाराज” लाड कारंजा, जिल्हा वाशीम येथून या भागात आले. त्यांचे बरोबर श्री क्षेत्र काशी-मणिकर्णीकेजवळ असलेल्या ६४ योगिनी आल्या. प्रथम त्यांनी “औदुंबर-भुवनेश्वरी” (गुरुचरित्र १७ वा अध्याय) जि. सांगली येथे दर्शन घेतले. नंतर अमरापुरी येऊन श्री अमरेश्वर लिंगाचे दर्शन घेतले व नंतर महाराज तपश्चर्येसाठी नृसिंह वाडीला गेले. त्यांचे सोबत आलेल्या योगिनी अमरापुरीच राहिल्या. श्री महाराजांनी नृसिंह वाडी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी अमरापुरी राहिलेल्या योगिनी मध्यांन्ह काळीं सेवेला म्हणून वाडीला जातात. त्यांची पूजा करावी, आरती करावी व भिक्षेला घेऊन जातात तेच हे स्थान. (गुरुचरित्र १९वा अध्याय) श्री अमेरेश्वरांचे दर्शन श्री काशी विश्वेश्वरासमान आहे.

श्री विग्रह दत्त अमरेश्वर
श्री विग्रह दत्त अमरेश्वर
प. प. श्री दीक्षित स्वामी महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या मूर्ती,

१) महागणपती
२) एकमुखी सहाभुजा मूर्तीच्या उजवे बाजूस श्री टेंबे स्वामींच्या सर्व चिन्हांकित पादुका
३) अमरेश्वर लिंग
४) चौसष्ठ योगिनी ८ मूर्ती ८ प्रतिकात्मक-मूर्तस्वरूप
५) श्री वासुदेव पीठ एकमुखी दत्त (सत्यदत्त), उभी मूर्ती
६) पादुका दर्शन- श्री टेम्बे स्वामी, श्री दीक्षित स्वामी, भगवान श्री दत्त प्रभू
७) व्यास यंत्र

या अमरापूर क्षेत्रात कृष्णा पंचगंगा संगम म्हणजे प्रयाग आहे. ही अमरापुरी म्हणजेच काशी होय. गोपुर हीच गया होय अशीही दक्षिणेकडील त्रिस्थळी मानलेली आहे.

घेवडा वेल
श्रीगुरुंनी दरिद्री ब्राह्मणाच्या घरी घेवड्याच्या शेंगांचा वेल उपटून त्याचे दरिद्र हरण केल्याचा प्रसंग

प. पु. दीक्षित स्वामींचा उपदेश-
“आमच्या गुरु महाराजांनी जे केले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही अखंड आचरले, तेच हितकारक आहे ”

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” हा श्री दत्त नाममंत्र अखंड जपत राहावे म्हणजे सर्व मंगलमय होईल.

श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ औरवाड (अमरापूर)…

भिलवडी प्रमाणेच अमरापूर व नृसिंहवाडी येथे दोन्ही तीरांवर श्रीगुरुंचे वास्तव्य होते. प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांना हे स्थान अतिशय प्रिय होते. स्वामी महाराजांचे परमशिष्य प.प.श्री दीक्षितमहाराजांवर विशेष प्रेम होते. स्वामी महाराज येणार्या भक्तांना नेहमी म्हणत की दीक्षित महाराजांचा अधिकार खुप मोठा आहे श्री नृसिंहसरस्वती दीक्षित स्वामी यांनी स्वामी महाराजांच्या समाधी नंतर अमरापूर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती पीठाची स्थापना केली आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विविध ठिकाणी भ्रमंती आणि चातुर्मास करीत असताना जे लिखाण करीत ते अमरापूरला दीक्षितस्वामींकडे पाठवून देत असत. त्यांनीच ते सर्व साहित्य संकलित केले आहे. दीक्षित स्वामींचा अधिकार खूप मोठा आहे असे प. प. श्री टेंबे स्वामी नेहमी म्हणत असत. अमरापूर महात्म्य सांगताना श्रीनृसिंहसरस्वती स्वामी म्हणाले आहेत.

श्री योगिनी माता, अमरापूर
प्रयाग: संगम: ख्यात: काशिकात्वमरापुरी ॥
गया तु गोपुरी ज्ञेया दक्षिणी त्रिस्थली स्मृता ॥

याठिकाणी श्रीदत्त पादुका, प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पादुका आणि प. प. दिक्षितस्वामी महाराजांच्या पादुका आहेत. तसेच व्यासयंत्र आहे. दिक्षीत स्वामी महाराजांनी अमरेश्वर माहात्मावर बारा श्लोकी स्तोत्र लिहले आहे

अमरेश्वर माहात्म स्तोत्र
प्रयागः संगमः ख्यातः l काशिकात्वमरापुरी ll
गयातु गोपुरी ज्ञेया l त्रिस्थली दाक्षिणी स्मृता ll १ ll

वास्वादिदेवाः पितरोर्यमाद्या l रुद्रादि देवा निवसंति सर्वे l
शुक्लात्परं गोपुरि तार्थराजं l गोतीर्थमेतत्वपरं च रुद्रं ll २ ll

तीर्थं पितृणां च हि तत्र दान l स्नानादि पुण्यं हयमितं च नित्यं ll
तीर्थेश्वराणा मुपचार युक्तं l पुजाफलं सत्सकलार्थवित्वं ll ३ ll

गोविंदगोपालकगोविलासी l गोपुण्यतीर्थे च वसत्यकामः
गोलोक गोभिः सहितो विलासं l नित्यं स राधारति कृन्मुकुंदः ll ४ ll

एवं देवाश्वामरेशस्य नित्यं l पूजां कृत्वा सर्वतीर्थे वसंति ll
सर्वेशं तं सच्चिदानंद पूर्णं l नित्यं वंदे स्वेष्टदं चामरेशं ll ५ ll

सर्वतीर्थात्परं तीर्थं l नामरेशात्परो गुरूः l
नान्नपूर्णा योगिनोभ्यो l भुक्तिमुक्तिविरागदाः ll ६ ll

अखिलानि च तीर्थानि l ब्रहमाण्डान्तर्गतानि च l
देव सिध्देश्वरादीनि l संति तान्यमरापुरे ll ७ ll

कैलासवासी गिरिजाविलासी l काशीनिवासी मरेश्वरो S सौ l
श्री काशिगंगामाणिकर्णिकाश्वा S मरापुरे सर्वतीर्थे वसंति ll ८ ll

श्रीशान्नपूर्णेश योगिनीयुक् l स तिष्ठतीहामरपुर्यजस्त्रं l
श्रीदत्त देवोह्युभयर्द्धिसिध्या S मरापुरे काशिपुरेश देवः ll ९ ll

अनाद्यनंतः श्रुतिशास्त्रसारो l महात्परानंद चिदेक कंदः l
श्रीकाशिनाथो ह्य मरेश्वरो यो S मरापुरे देव गणान्वितोस्ति ll १० ll

करीश पन्नगांगो S सौ l हारी कमल लोचनः l
कमलामलपादाब्ज l श्रीहरिर्गिरिजापतिः ll ११ ll

नीलांगो गिरिगोगोप गोपी चंदनगोप्रियः l
सुनंदनंदी गाणेश कुमारतनयप्रियः l
गंगाशशिवरांगः श्रीमोक्षलक्ष्मीपदप्रदः ll १२

अमरापूर या महाक्षेत्राला “श्रीवासुदेवानंदसरस्वती
पीठ” असे नांव दिले आहे.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
|| विजयते श्री नृसिंहसरस्वती ||

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

निधन वार्ता-दिनकर रामदास जोशी (गुरुजी)

Next Post

मुकेश अंबानी यांचा नातू कोणत्या शाळेत शिकतो?

Next Post
मुकेश अंबानी यांचा नातू कोणत्या शाळेत शिकतो?

मुकेश अंबानी यांचा नातू कोणत्या शाळेत शिकतो?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

अमळनेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; लेकाला वाचविण्यासाठी तलावात उतरलेला बापही बुडाला खवशी येथे बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या...

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू; कौटुंबिक वादाच्या तक्रारीने प्रकरणाला वेगळे वळण जळगाव : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरुवारी पहाटे एकाच...

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

IAS परीक्षेत अपयश, पहिला व्यवसायही बुडाला; तरी हार मानली नाही, उभारली 95 हजार कोटींची कंपनी UPSCची तयारी करूनही IAS होण्याचे...

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग

by दैनिक मार्केट स्पेशल
August 27, 2026
0

इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध हरियाणवी गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; भररस्त्यात २० राऊंड फायरिंग 🚨 इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकावर भररस्त्यात अंदाधुंद...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव जिल्ह्यातील आजच्या 10 महत्त्वाच्या बातम्या 1. जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जळगाव...

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

निधन वार्ता- सौ. सीमा संजय वैजापूरकर यांचे निधन

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

जळगाव - येथील सौ. सीमा संजय वैजापूरकर (विभावरी पुंडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि 27 रोजी...

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

पॅरोलवर बाहेर आला अन् ४० वर्षे फरार; सरकारी शिक्षकाची नोकरी मिळवली, ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारही मिळवला; निवृत्तीनंतर अटक जन्मठेपेचा कैदी चार...

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण

by दैनिक मार्केट स्पेशल
August 26, 2026
0

साखरेचे भाव कोसळले; चार दिवसांची तेजी थांबली, केंद्राच्या निर्णयानंतर दरात मोठी घसरण नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील साखरेच्या...

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध महत्त्वाच्या बातम्या

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील उपलब्ध ताज्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे आहेत. १. ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; बालकाचा मृत्यू,...

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या बदली विरोधात केले घरात आंदोलन ; पालक वर्ग उतरला रस्त्यावर

by दैनिक मार्केट स्पेशल
August 25, 2026
0

‘गुरुजी परत द्या, नाहीतर आमच्या ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढा’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक आज राज्यात एक ठिकाणी विद्यार्थी आपल्या...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697