Monday, October 19, 2026
Dainik Market Special
Advertisement
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता
No Result
View All Result
Dainik Market Special
No Result
View All Result

पितृपक्षाच्या पावन पर्वावर ब्राह्मण सभा व मांगल्य सेवा संस्थेतर्फे गरजूंना धान्य व शिध्याचे मोफत वितरण

दैनिक मार्केट स्पेशल by दैनिक मार्केट स्पेशल
October 11, 2026
in jalgaon
0
पितृपक्षाच्या पावन पर्वावर ब्राह्मण सभा व मांगल्य सेवा संस्थेतर्फे गरजूंना धान्य व शिध्याचे मोफत वितरण
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पितृपक्षाच्या पावन पर्वावर ब्राह्मण सभा व मांगल्य सेवा संस्थेतर्फे गरजूंना धान्य व शिध्याचे मोफत वितरण

सर्वपित्री अमावस्येला सेवाभावी सामाजिक उपक्रम; ब्राह्मण सभेच्या सहकार्याने उपक्रम उत्स्फूर्तपणे संपन्न

जळगाव, दि. ११ ( प्रतिनिधी ) — पितृपक्षाच्या पावन पर्वावर सर्वपित्री अमावस्येचे औचित्य साधून मांगल्य सेवा संस्थेतर्फे १० ऑक्टोबर रोजी ब्राह्मण सभेत समाजातील गरजू कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक किराणा वस्तूंच्या शिध्याचे मोफत वितरण करण्यात आले. आपल्या वाडवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू व्यक्तींना मदतीचा हात द्यावा, या उद्देशाने संस्थेने केलेल्या आवाहनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून ब्राह्मण सभेच्या संयुक्त सहकार्याने हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता ईश प्रार्थनेने झाली. मांगल्य सेवा संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र कुळकर्णी  यांनी प्रास्ताविकातून संस्थेतर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच पितृपक्षात गरजू कुटुंबांना मदत करण्यामागील संस्थेची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष अमोल जोशी आणि श्यामसुंदर कलभंडे यांचा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कुळकर्णी व सचिव किरण कुळकर्णी यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला.

समाजोपयोगी कार्यातून गरजूंना आधार

मांगल्य सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. गोसेवा,गरजू रुग्णांना रुग्णोपयोगी साहित्य वर्षभर  उपलब्ध  करून देण्याची सेवा , गरजूंना विविध वस्तूंचे मोफत वाटप, वस्त्रदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण तसेच महिलांसाठी सामाजिक , आरोग्यविषयक सेवाभावी उपक्रम मांगल्य संस्थेमार्फत राबविण्यात येतात. समाजातील तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष अमोल जोशी यांनी मांगल्य सेवा संस्थेच्या पितृपक्षातील सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. गरजू व उपेक्षित कुटुंबांना मदतीचा आधार मिळाल्याने त्यांच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण होते. अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व करसल्लागार श्यामसुंदर कलभंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणाऱ्या मांगल्य सेवा संस्थेच्या कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी आणि अशा सेवाकार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पदाधिकाऱ्यांचे परिश्रम

हा सेवाभावी उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रवीण कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष तथा योगविद्या प्रशिक्षक रवींद्र कुळकर्णी, सचिव किरण कुळकर्णी, राजेश कुळकर्णी, मेरिको इंडस्ट्रीजचे अधिकारी किरण कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते व महाबळ परिसरातील प्रसिद्ध  बांधकाम व्यावसायिक भूपेश कुळकर्णी, स्वानंद कुळकर्णी, ब्राह्मण सभेचे चिटणीस जितेंद्र याज्ञिक, कार्यकारणी सदस्य कमलाकर फडणीस,किरण कुळकर्णी तसेच सौ. कल्याणी कुळकर्णी, सौ. प्राची कुळकर्णी, सौ. दीपाली कुळकर्णी आणि सौ. शुभांगी नाईक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जोशी यांनी केले.

पुर्वजांच्या स्मृतींना सामाजिक सेवेची जोड देत गरजू कुटुंबांना मदतीचा आधार देणारा हा उपक्रम समाजातील दातृत्व, संवेदनशीलता आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -

https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766

विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.

Your browser does not support the video tag.
Your browser does not support the video tag.
HTML img Tag Simply Easy Learning
WhatsApp Join WhatsApp
Join Now
Facebook Follow Facebook Page
Follow Now
Previous Post

जळगावात विकासकामांच्या यादीवरून महासभा तापली! शिंदेसेनेचा भाजपला थेट सवाल

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनची ‘रचनात्मक कार्यक्रम’ विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

गांधी रिसर्च फाऊंडेशनची 'रचनात्मक कार्यक्रम' विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? ‘ही’ लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

पुरूषांमध्ये का वाढतोय प्रोस्टेट कॅन्सर? 'ही' लक्षणे व संकेत अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवावर बेतू शकतं कर्करोग पुरुषांमधील प्रोस्टेट...

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

मुंबई ते कोटा व्हाया सुरत, टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कसं पकडलं ? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं बॉलिवूडचा अभिनेता टायगर...

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावातील गुरुदत्त नगरात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन स्वयंसेवकांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन जळगाव : विजयादशमी अर्थात दसरा या...

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा दुर्दैवी अंत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; एकाच वेळी तिन्ही चुलत भावांचा तिघांचा दुर्दैवी अंत   अपघातातील तिघही मयत तरुण एकमेकांचे...

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन 

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन  ‘बालविवाह रोखा, मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा!’ या विषयावर जनजागृती*...

आजचे राशिभविष्य : 5 सप्टेंबरला चंद्राच्या राशीबदलाचा 12 राशींवर परिणाम; कोणाला धनलाभ तर कोणासाठी वाढणार चिंता?

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

by दैनिक मार्केट स्पेशल
October 19, 2026
0

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत मेष - आपली कामातली मरगळ दूर होईल. काम करण्यास आनंद वाटल्याने...

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

इतकं चांगले खेळूनही वैभवला आणखी किती थांबावे लागणार? श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगितलं   भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर शनिवारी म्हणाला की,...

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊडस्पीकरवरील ‘ती’ घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं?

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

तुफान पाऊस, अरुंद गल्ली, लाऊड स्पीकरवरील 'ती' घोषणा अन् 19 जणांचा मृत्यू ; कोलकात्यामध्ये चेंगराचेंगरीआधी काय घडलं ? पश्चिम बंगालची...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! वन विभागात 25 ते 30 हजार पदांची भरती होणार महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक...

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर

by दैनिक मार्केट स्पेशल
October 18, 2026
0

काव्या मारनचं ठरलं ! या दिवशी 'सनरायझर्स हैदराबाद'ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून, कार्यक्रम पत्रिकाच समोर   सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • जळगाव
    • अमळनेर
    • भडगांव
    • भुसावळ
    • बोदवड
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धारणगांव
    • एरंडोल
    • जामनेर
    • जळगाव तालुका
    • मुक्ताई नगर
    • पाचोरा
    • पारोळा
    • रावेर
    • यावल
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • खेळ
  • मनोरंजन
  • इतर
    • वाढदिवस
    • निधन वार्ता

© Website Design by Digital Buffalo - 9028927697