महासभेत उपस्थित नगरसेवकाच्या कंबरेला पिस्तूल, राजकारणात खळबळ, महापालिका आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया
जळगाव महापालिकेच्या महासभेत उपस्थित शिवसेना नगरसेवकाच्या कंबरेला पिस्तूल लावल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओवरुन विविध चर्चांना उधाण आलं होतं. संबंधित नगरसेवकावर कारवाई होणार का ? याबाबत महापालिका आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव प्रतिनिधी : जळगाव महापालिकेच्या शुक्रवारी नुकत्याच पार पडलेल्या महासभेत एक अत्यंत वादग्रस्त आणि सुरक्षेला गंभीर आक्षेप घेणारी घटना समोर आली आहे. महापालिकेच्या या अधिकृत सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट आपल्या कमरेला पिस्तूल लावून सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जळगाव महापालिकेच्या महासभेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संतोष पाटील आपल्या कमरेला पिस्तूल लावून उपस्थित राहिल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे. संपूर्ण महासभा संपेपर्यंत त्यांच्या कमरेला पिस्तूल असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सभागृहात शस्त्र नेण्यासंबंधी नियमांचा भंग झाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरसेवकाला भीती कुणाची?
महानगरपालिकांच्या सभागृह म्हणजे हे पवित्र मंदिर मानले जाते. या सभागृहात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागत असतात. मात्र या नगरसेवकाने कमरेला बंदूक लावून येणे म्हणजे या नगरसेवकाला नेमकी भीती कुणाची होती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या सभागृहामध्ये बंदूक आणण्याची परवानगी या नगरसेवकाला कुणी दिली? सभागृहात जर अशा पद्धतीने बंदूक घेऊन नगरसेवक प्रवेश करत असेल तर सुरक्षा रक्षकामाची सुरक्षा ही दावणीला बांधली आहे? असा प्रश्न जळगावमधील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.
महापालिका आयुक्त काय म्हणाले?
या प्रकारावर जळगाव महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार आपल्याला स्वतःच्या निदर्शनास आला नसून संबंधित पुरावे आणि तक्रारीच्या आधारे शासनाचे नियम, शस्त्र अधिनियमातील तरतुदी तसेच महापालिका कायद्यातील नियम तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी सांगितले.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.









