
मुंबई (प्रतिनिधी) –
भारतीय क्रिकेट टीम इंडिया मध्ये लवकरच मोठे बदल होण्याची चर्चा सुरू आहे. इंग्लंडमधील सध्याच्या एकदिवस ओडीआय मालिकेदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. 19 जुलै रोजी लॉर्ड्सवर होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, अशी जोरदार चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय निवड समिती 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक 2027 विश्वचषकाचा विचार करून भविष्यातील संघ उभारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ज्यामध्ये युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याच्या धोरणावर काम करत आहे.

रिपोर्ट्सनुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर रोहित शर्माला एकदिवसीय संघात कायम ठेवण्याच्या बाजूने ते नसल्याचे समजते. युवा खेळाडूंना घडवण्याची वेळ आली आहे, असे निवड समितीचे मत आहे.
रोहित शर्माची अलीकडील एकदिवसीय कामगिरी अपेक्षांनुसार झालेली नाही. त्याने आपल्या शेवटच्या आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये 30.1 ची सरासरी आणि 88.6 च्या स्ट्राईक रेटसह 241 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले आहे. परिणामी, निवड समिती भविष्यासाठी संघ उभारण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे वृत्त आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, निवड समिती युवा सलामीवीरl यशस्वी जयस्वालला सातत्याने संधी देण्याचा विचार करत आहे. इंग्लंड दौऱ्यात तीन डावांत दोन शतके झळकावणाऱ्या जयस्वालला आगामी काळात सुमारे 20 एकदिवसीय सामन्यांत खेळवण्याची योजना आहे, जेणेकरून तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग बनेल.

सूत्रांच्या मते, जर रोहित शर्मा संघात कायम राहिला, तर जयस्वालला नियमित संधी मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, भविष्यातील संघाची रचना लक्षात घेऊन निवड समिती बदलांचा विचार करत आहे.
या वृत्तात असेही नमूद केले आहे की, कोणत्याही खेळाडूवर निवृत्तीसाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. रोहित शर्माच्या भविष्याबाबतचा अंतिम निर्णय त्याच्याच हातात आहे. तरीही, सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेपूर्वी निवड समिती एका नवीन दिशेने वाटचाल करण्यास इच्छुक असल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचे विराट कोहलीबाबत एक वेगळे मत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, कोहलीचा सध्याचा फॉर्म आणि तंदुरुस्ती पाहता, एकदिवसीय संघासाठी तोच पहिली पसंती आहे. त्यामुळेच, अहवालात नमूद केल्याप्रमाणे, सध्या संघात विराट कोहलीच्या स्थानाबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नाहीये.

व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










