आजचे राशिभविष्य, १६ ऑक्टोबर २०२६ : तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
मेष – कामामध्ये बदल होऊ शकतात. जोडीदाराची साथ चांगली राहील. मुलांना यश मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. प्रवास मात्र टाळा सौख्यात वाढ होईल.
वृषभ – नोकरी व्यवसायामध्ये चांगली परिस्थिती राहील.मुलांना समजून घ्या, त्यांना योग्य तो सल्ला द्या, त्यांची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, प्रवास शक्यतो टाळा.
मिथुन – व्यापार-व्यवसाय कडे थोडे जास्तच लक्ष द्यावे लागेल. मोठे निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या.जरूर पडली तर तज्ञांचा सल्ला घ्या. रागावर नियंत्रण हवे .
कर्क – नोकरी मध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता, कामाचा ताण वाढेल. प्रवास शक्यतो टाळा. तब्येतीला जपणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
सिंह – कामाचे नियोजन करण्यासाठी वेळ द्या. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती राहिल. सुखसोयी मिळतील. पूजा पाठ करण्यात आनंद वाटेल. व्यापार-व्यवसायात योजलेले कामे व्यवस्थित पार पडतील.
कन्या – आज तुमचे मन थोडे अस्थिर राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल, नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती आर्थिक असेल. आवक चांगली राहणार आहे.
तुळ – मन प्रसन्न राहील जोडीदाराशी सामान्य संबंध राहतील. व्यवसायात चांगलीच आघाडी घ्याल ,यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, खर्च मात्र जपून करा.
वृश्चिक – स्वतःच्या कामांसाठी खूप धावपळ करावी लागेल. काही कामे मात्र अर्धवट होण्याची शक्यता आहे. आपले अंदाज बरोबर येतील.
धनु – विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणाच्या संधी मिळतील.आजचा दिवस प्रवाही राहणार आहे. नोकरी व्यवसायातून लाभ मिळणार आहे.कायदेशीर बाबी मात्र सांभाळा. कलागुणांना यश येणार आहे.
मकर – गृहसौख्य चांगले लाभेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. व्यवसायामध्ये सामान्य परिस्थिती राहील.
कुंभ – भावंडांशी सुसंवाद होतील. यांच्याशी संपर्क साधल्याने मन आनंदित राहील .नोकरी व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. तुमचे व्यवसायात नोकरीमध्ये वर्चस्व असेल.
मीन – आज जास्त लांबचे प्रवास करू नका. प्रवासात दगदग निर्माण होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/BpTuswQo5JaGl3dMcIcFlK?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.











